Remdesivir ही कोरोनाच्या उपचार पद्धतीच्या यादीतून बाद होणार?

मुंबई तक

• 04:13 AM • 19 May 2021

Remdesivir चा काळाबाजार, Remdesivir चा भासणारा तुटवडा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने अनुभवल्या. त्यावरून देशभरात झालेलं राजकारणही पाहिलं. मात्र आता हेच Remdesivir इंजेक्शन कोरोना उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णांवर केल्या जाणारी प्लाझ्मा थेरेपी केंद्र सरकारने उपचारांच्या यादीतून वगळली. त्या पाठोपाठ आता रेमडेसिवीर हे इंजेक्शनही उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची चिन्हं आहेत. दिल्लीतील सर गंगाराम […]

Mumbaitak
follow google news

Remdesivir चा काळाबाजार, Remdesivir चा भासणारा तुटवडा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने अनुभवल्या. त्यावरून देशभरात झालेलं राजकारणही पाहिलं. मात्र आता हेच Remdesivir इंजेक्शन कोरोना उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णांवर केल्या जाणारी प्लाझ्मा थेरेपी केंद्र सरकारने उपचारांच्या यादीतून वगळली. त्या पाठोपाठ आता रेमडेसिवीर हे इंजेक्शनही उपचारांच्या यादीतून वगळलं जाण्याची चिन्हं आहेत. दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. एस राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

आम्हाला दिवसाला 50 हजार Remdesivir ची गरज, पण मिळतात फक्त.., राजेश टोपेंनी दिली धक्कादायक माहिती

काय म्हणाले आहेत डॉ. राणा?

प्लाझ्मा थेरेपीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णाला कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज दिल्या जातात. जेणेकरून त्या अँटीबॉडीज संसर्ग झालेल्या विषाणूला संपवतील. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. मात्र प्लाझ्मा दिल्यामुळे रूग्णाच्या तब्बेतीत कोणतीही सुधारणा होत असल्याचं दिसून आलेलं नाही. मागच्या वर्षभरापासून आम्ही हे बघत आहोत. तसंच प्लाझ्मा सहज उपलब्धही होत नाहीये. त्यामुळे ती थेरपी थांबवण्यात आली आहे. अशाच प्रकारचा विचार आम्ही Remdesivir या इंजेक्शनचा विचार करतो आहोत. कोरोना रूग्णांवर उपचारांसाठी वापरलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रूग्णांवर कोणत्याही प्रकारे सकारात्मक परिणाम करत नाही. त्याचे पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या उपचारांवर करण्यात येणाऱ्या उपचार पद्धतींवरच्या यादीतून हे इंजेक्शन वगळलं जावं याचा विचार आम्ही करतो आहोत.

नागपुरात कोरोना रूग्णाला Remdesivir ऐवजी दिलं Acidity चं इंजेक्शन, पाचजण अटकेत

रेमडेसिवीर हे औषध लवकरच कोरोना रूग्णांवरच्या उपचार पद्धतींमधून लवकरच वगळण्यात येईल असे संकेत डॉ. राणा यांनी ANI शी बोलताना दिले आहेत. केंद्र सरकारने प्लाझ्मा थेरेपी उपचारांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता रेमडेसिवीर इंजेक्शनही वगळले जाणार असल्याचे संकेत आहेत. कोरोना रूग्णांवर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीविषयी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी प्लाझ्माच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी केंद्राला इशारा दिला होता त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

BJP चे शिरीष चौधरी ब्रुक फार्माचे Remdesivir लोकांना वाटत होते, त्यांना संमती कुणी दिली?

रेमडेसिवीरबाबत WHO ने काय म्हटलं होतं?

WHO ने केलेल्या अभ्यासानुसार रेमडेसिवीर हे औषध कोरोना मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी ठरत नाही. असं WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केलं आहे.

ऑक्सिजन टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी काय म्हटलं होतं?

रेमडेसिवीर घेतल्याने जे रूग्ण रूग्णालयात दाखल असतात त्यांचा रूग्णालयातील कालावधी सरासरी 1 ते 3 दिवस एवढं कमी करण्याचं काम हे इंजेक्शन करतं. ज्या रूग्णांना कोरोनाची लक्षणंही दिसत नाहीत त्यांच्यासाठी या इंजेक्शनचा वापर करण्याची गरज नाही. ज्यांना मध्यम लक्षणं आहेत किंवा सहव्याधी असताना कोरोना झाला तर त्यांनाही हे इंजेक्शन देऊ नये. जसं वर नमूद केलं आहे त्याप्रमाणे कोव्हिड झाल्याच्या दुसऱ्या ते दहाव्या दिवसांपर्यंत पहिल्या टप्प्यात हे इंजेक्शन दिलं गेलं पाहिजे.

    follow whatsapp