सचिन वाझेच्या भावाची प्रतिक्रिया, पाहा कोर्टाकडे काय केली मागणी

मुंबई तक

• 12:28 PM • 07 Apr 2021

मुंबई: अँटेलिया कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे याच्या एनआयए कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 9 एप्रिलपर्यंत सचिन वाझे हा एनआयएच्या ताब्यातच असणार आहे. आजच्या या सुनावणीनंतर सचिन वाझेचा भाऊ सुधर्म वाझे याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुधर्म वाझे एवढंच म्हणाले की, ‘आम्ही मागे देखील सांगितलं […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: अँटेलिया कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे याच्या एनआयए कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 9 एप्रिलपर्यंत सचिन वाझे हा एनआयएच्या ताब्यातच असणार आहे. आजच्या या सुनावणीनंतर सचिन वाझेचा भाऊ सुधर्म वाझे याने माध्यमांशी संवाद साधला.

हे वाचलं का?

यावेळी सुधर्म वाझे एवढंच म्हणाले की, ‘आम्ही मागे देखील सांगितलं आहे की, एनआयए आणि न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे. याच्यापलीकडे आम्हाला काही सांगायचं नाही. त्यांच्या आरोग्यासंबंधी आम्ही कोर्टाला सांगितलं आहे. तसंच अँजिओग्राफीसाठी कोर्टाकडे विनंती केली आहे.’ असं सुधर्म वाझे म्हणाले.

दरम्यान, सचिन वाझे यांनी एनआयए कोठडीत असताना कोर्टाला एक पत्र लिहलं असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. पण या पत्राबाबत विचारलं असता सुधर्म वाझे यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

CIU मधील अनेक अधिकारी NIA च्या रडावर

दरम्यान, एनआयएने दावा केला आहे की अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेसोबत काही पोलीस अधिकारीही सहभागी आहेत.

एनआयएने सचिन वाझेंच्या टीमचीही चौकशी केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये डीसीपी रँकपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी एनआयएने केली आहे. एपीआय रियाझ काझी आणि एपीआय प्रकाश होवाळ या दोघांनाही एनआयएने अनेकदा चौकशीसाठी बोलावलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अँटेलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात एनआयच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएकडून आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं.

परमबीर सिंग यांची NIA कडून तब्बल 3 तास चौकशी

दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची देखील एनआयएने चौकशी केली. सध्या होमगार्ड विभागाचे DG म्हणून कार्यरत असलेल्या परमबीर सिंग यांना आज सकाळीच NIA ने चौकशीसाठी आपल्या मुंबईतील कार्यालयात बोलवलं होतं.

सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत परमबीर सिंग यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत NIA चे अधिकारी परमबीर सिंग यांना त्यांचे आणि वाझेंचे असणारे संबंध, पोलीस अधिकारी म्हणून त्यांची कार्यपद्धती याबद्दल प्रश्न विचारण्यात आलं असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळचं वळण लागलं. राज्य सरकारने तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त यांची पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेंकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला.

ज्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यानंतर अनिल देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

    follow whatsapp