शेअर बाजाराची ऐतिहासिक मुसंडी! निर्देशांक पहिल्यांदाच ६० हजारांच्या पार

मुंबई तक

• 05:20 AM • 24 Sep 2021

आठवड्याच्या अखेरीस शेअर मार्केटमध्ये उत्साह बघायला मिळाला. सेंसेक्सने जोरदार उसळी घेत पहिल्यांदाच ६० हजारांच्या पुढे झेप घेतली. शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांकाने २७३ अंकांची उसळी घेत ६०,००० चा टप्पा पार केला. बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंनने ऐतिहासिक झेप घेतली. शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली. शेअर बाजाराचं कामकाज सुरू होताच बीएसईने निर्देशांकाने उसळी घेतली. सेंसेक्स […]

Mumbaitak
follow google news

आठवड्याच्या अखेरीस शेअर मार्केटमध्ये उत्साह बघायला मिळाला. सेंसेक्सने जोरदार उसळी घेत पहिल्यांदाच ६० हजारांच्या पुढे झेप घेतली. शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांकाने २७३ अंकांची उसळी घेत ६०,००० चा टप्पा पार केला.

हे वाचलं का?

बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंनने ऐतिहासिक झेप घेतली. शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली. शेअर बाजाराचं कामकाज सुरू होताच बीएसईने निर्देशांकाने उसळी घेतली. सेंसेक्स ४०० अंकांनी वाढून ६०, २९४.५३ वर स्थिरावला आहे. तर एनएसईच्या (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) निर्देशांक १०० अंकांनी वाढून १७ हजार ९२० वर पोहोचला आहे.

निर्देशांकामध्ये ३० कंपन्यांच्या शेअर्सपैकी १९ कंपन्यांचे शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर ११ कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ बघायला मिळाली नाही. इन्फोसिस, एचसीएल आणि टीसीएसच्या शेअर्स १ टक्क्यांने वधारले आहेत. तर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसत आहे.

आठ महिन्यात ओलांडला १०,००० अंकांचा टप्पा

जगभरातील शेअर बाजारात तेजीचं वातावरण असून, भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा टप्पा गाठला आहे. शुक्रवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ६० हजारांचा टप्पा पार केला. अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत शेअर बाजाराने १० हजार अंकांची झेप घेतली आहे.

जानेवारीमध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक ५० हजारांवर होता. फेब्रुवारीमध्ये ५१ हजारांवर पोहोचला. त्यानंतर एकदम मुसंडी मारत फक्त दहा दिवसात (१५ फेब्रुवारी) शेअर बाजाराने १ हजार अंकांचा टप्पा ओलांडत ५२ हजारांवर झेप घेतली होती.

फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान निर्देशांकाची वाढ मंदावली होती. जूननंतर पुन्हा हळूहळू तेजी दिसू लागली आणि ऑगस्टमध्ये निर्देशांक ५५ हजारांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये निर्देशांकात तीन हजार अंकांची वाढ झाली. ऑगस्ट अखेरीस निर्देशांक ५७ हजारांवर पोहोचला होता.

शेअर बाजारातील तेजी कायम राहिल्याने २० दिवसांत तीन हजार अंकांचं अंतर कापत शेअर बाजाराच्या निर्देशांकाने शुक्रवारी ऐतिहासिक उसळी घेतली. दरम्यान, अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने व्याजदरात कोणतेही बदल न केल्याचा परिणामही जगभरातील शेअर बाजारात दिसत आहेत.

    follow whatsapp