सचिन वाझेच्या ‘लेटरबॉम्ब’आधी दिवसभरात काय-काय घडलं?, समजून घ्या Chronology

मुंबई तक

• 03:10 PM • 07 Apr 2021

मुंबई: अँटेलिया संशयित कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA च्या अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने एक अत्यंत खळबळजनक पत्र लिहलं आहे. या पत्रातून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण हे पत्र बाहेर येण्याआधी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: अँटेलिया संशयित कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA च्या अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने एक अत्यंत खळबळजनक पत्र लिहलं आहे. या पत्रातून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण हे पत्र बाहेर येण्याआधी आज दिवसभरात काय-काय घडलं (chronology) हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

हे वाचलं का?

सचिन वाझेचं पत्र बाहेर येईपर्यंतचा नेमका घटनाक्रम कसा आहे?

  • आज दिवसाची सुरवात झाली ती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्य सरकारला सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्याच्या प्रक्रीयेबद्दल एक अहवाल सादर केला. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की, सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्याचा निर्णय हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या रिव्ह्यू मिटींगमध्ये झाला होता. ज्या बैठकीला स्वतः पोलीस आयुक्त, आर्म फोर्सेसचे अतिरीक्त आयुक्त, जॉइंट सीपी (Admin) आणि मंत्रालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस उपायुक्त हजर होते.

  • पोलीस दलात वाझेला सामावून घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांची आर्म फोर्सेसमध्ये नेमणूक करण्यात आली होती. यानंतर ९ जून २०२० रोजी गुन्हे शाखेच्या सह आयुक्तांनी सचिन वाझेंची CIU मध्ये बदली केली.

Sachin Vaze यांच्या कथित पत्रामुळे खळबळ, पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावं

  • याच दरम्यान, NIA ने आज सकाळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी बोलावलं.

  • दुसरीकडे त्याचवेळी त्यांनी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना देखील चौकशीसाठी बोलावलं होतं.

  • या सगळ्या दरम्यान, आज सकाळी आणखी एक पत्र बाहेर आलं. ते होतं. एसीपी पाटील यांचं. एसीपी पाटील हे मुंबईतील सोशल ब्राँचचे प्रमुख आहेत. या सोशल ब्रँचचं काम असतं की, बार, हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई करण्याचं. याच एसीपी पाटलांचा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला होता. त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला होता. या चॅटमध्ये ते असं सांगत होते की, पाटील आणि वाझे यांना अनिल देशमुख यांनी बोलावलं होतं. दरम्यान, यानंतर याच प्रकरणी पाटील यांनी आपला जबाब क्राईम ब्रांचचे प्रमुख यांच्याकडे दिलं. त्यात ते असं सांगतायेत की, ‘मी त्या तारखांना अनिल देशमुखांना भेटलोच नाही. ज्या तारखा व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सांगण्यात आल्या आहेत.’ यावेळी पाटील यांचं असं म्हणणं आहे की, 4 तारखेला त्यांना सचिन वाझे हे ऑफिसमध्ये भेटले होते. त्यावेळी सचिन वाझे यांनी त्यांना सांगितलं होतं की, अनिल देशमुखांनी त्यांना सांगितलं होतं की, 100 कोटीची वसुली करा. पण सचिन वाझे हे अनिल देशमुखांना खरोखरच भेटले होते का? याबाबत पाटील यांना काहीच माहित नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की, ते देशमुखांना कधीच भेटलेले नाहीत.

बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो वाझेने केलेले आरोप धादांत खोटे: अनिल परब

  • त्यामुळे एका पद्धतीने अनिल देशमुखांबाबतचा जो दावा व्हॉट्सअॅप चॅटमधून करण्याचा जो प्रयत्न केला जात होता तो यामाध्यमातून खोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • हे संपतं न संपतं तोच सचिन वाझे आणि त्यांचे दोन सहकारी यांना NIA कोर्टात नेण्यात आलं. कोर्टात सचिन वाझेंच्या हातात एक पत्र होतं. तोपर्यंत परमबीर सिंग यांची चौकशी देखील संपली होती.

  • ते पत्र घेऊन सचिन वाझे हे कोर्टासमोर गेले. कोर्टाने सांगितलं की, हे पत्र काही आम्ही स्वीकारु शकत नाही. कारण तुम्ही योग्य ती प्रक्रिया पार पाडलेली नाही. पण ते पत्र मीडियाकडे पोहचलं.

    follow whatsapp