Sanjay Raut :”शिवसेना पक्ष हायजॅक करणं शक्य नाही, कुणी तसा प्रयत्नही करू शकत नाही”

मुंबई तक

• 08:48 AM • 25 Jun 2022

शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष आहे. या पक्षासाठी अनेक अनेक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. घाम गाळला आहे, अशा शिवसेनेला हायजॅक करणं शक्य नाही. कुणी कितीही ठरवलं तरीही शिवसेना हायजॅक करू शकत नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्याने आणि आपल्यासह […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष आहे. या पक्षासाठी अनेक अनेक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. घाम गाळला आहे, अशा शिवसेनेला हायजॅक करणं शक्य नाही. कुणी कितीही ठरवलं तरीही शिवसेना हायजॅक करू शकत नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्याने आणि आपल्यासह ३६ हून अधिक आमदार गुवाहाटीला घेऊन गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. त्यानंतर आता शिवसेना हायजॅक करणं कुणालाही शक्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीत आम्ही पक्षाच्या वर्तमानाबाबत आणि भविष्याविषयी चर्चा करू. शिवसेना पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचा आहे. हा पक्ष कुणी ठरवलं तरीही हायजॅक करू शकत नाही. तसा विचारही करूही शकत नाही. पैशांच्या जोरावर कुणीही पक्ष खरेदी करू शकत नाही.

सध्या जे संकट आलं आहे त्याला आम्ही संकट मानत नाही. आम्ही आता पक्ष विस्तार करतो आहोत. आम्ही या सगळ्याकडे संधी म्हणून पाहतो आहोत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आम्ही महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कुणीतरी महाशक्ती म्हणवणारा पक्ष बंडखोरांच्या मागे आहे म्हणून तो पक्ष विकत घेता येणार नाही.

लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरेही सांगायचे की मी शिवसेना प्रमुख जरूर पण हजारो, लाखो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख. आज उद्धव ठाकरेंच्या मागेही हजारो, लाखो शिवसैनिक आहेत. त्यामुळे पक्ष हायजॅक करता येणार नाही ती स्वप्नं कुणीही पाहू नये असाही इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

दहशतीच्या आणि अफवांच्या बळावर कुणीही शिवसेनेचं काहीही करू शकत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या पाठिशी उभे आहेत. आजच्या कार्यकारिणीत अनेक महत्त्वाचे निर्णय होतील. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले लोक पळून गेले आहेत.

एक लक्षात घ्या कुटुंबाला सुरक्षा नसते, आमदारांना असते. तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात, स्वतःला वाघ मानता तर मग आसामला कशाला गेला आहात? बकरीसारखी बे बे करू नका. महाराष्ट्रात या. अजूनही वेळ गेलेली नाही. तिकडे गुवाहाटीला जे आमदार आहेत त्यांच्यातल्या दहा आमदारांनी आमच्याशी बोलणं केलं आहे. फ्लोअर टेस्ट करा समजेल कुणामध्ये किती दम आहे.

मी हवेतल्या वल्गना करत नाही, आमच्याकडे ताकद आहे हे मला माहित आहे. महाराष्ट्रात येऊन बोलण्याची हिंमत दाखवा. लोकांमध्ये संताप आहे. या संतापाचा उद्रेक अजून झालेला नाही पण तो झाला तर गदारोळ माजेल, सध्या आम्ही सगळ्यांना संयम बाळगायला सांगितलं आहे. त्यांनी कुठलाही प्रस्ताव आणो काही फरक नाही पडत नाही. मुंबईत आले की खेला होबे म्हणजे खेळ सुरू होईल.

मी देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला देईन, ते खूप वर्षे राजकारणात आहेत. पहाटे शपथविधीमुळे जी इज्जत गेली आहे ना त्यातून उरलीसुरली इज्जत वाचवा. भाजपची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. फडणवीस यांनी या सगळ्यात पडून नुकसान करून घेऊ नये. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp