Uddhav Thackeray : सरकारकडे भावनांचा दुष्काळ; तात्काळ ५० हजार हेक्टरी मदत जाहीर करा

मुंबई तक

• 10:12 AM • 23 Oct 2022

औरंगाबाद : आज केवळ घोषणांची अतिवृष्टी चालली आहे. पण अंमलबजावणी नाही. या निर्दयी सरकारकडे भावनांचा कोरडा दुष्काळ आहे. पण आता तात्काळ ५० हजार हेक्टरी मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते औगंदाबादमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यानंतर बोलत होते. काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे म्हणाले, एका बाजूला दिवाळी […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद : आज केवळ घोषणांची अतिवृष्टी चालली आहे. पण अंमलबजावणी नाही. या निर्दयी सरकारकडे भावनांचा कोरडा दुष्काळ आहे. पण आता तात्काळ ५० हजार हेक्टरी मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते औगंदाबादमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यानंतर बोलत होते.

हे वाचलं का?

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले, एका बाजूला दिवाळी सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं दिवाळं निघालं आहे. शेतकऱ्यापुढे, त्यांच्या मुलांपुढे कपडे, अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण काळजी करु नका, धीर सोडू नका. सरकार नसलं तरी शिवसेना तुमच्या सोबत आहेत. महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षही तुमच्यासोबत आहेत.

गेल्या आठ दिवसात पुण्यातही आतोनात पाऊस पडला. पण उपमुख्यमंत्र्यांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. ते म्हणाले, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. मग आता ते म्हणतील की ग्रामीण भागात पाऊस किती पडावं हे सरकार ठरवतं नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शेतकऱ्यापुढे कायम दोन आपत्ती असतातच. एक म्हणजे दुष्काळ आणि दुसरी अतिवृष्टी. या आपत्ती आपल्या हातात नसतात. पण आपत्ती आल्यानंतर शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नसतं, त्यांचं घरदार उघड्यावर पडणार नाही, याची काळजी घेणं हे आपल्या हातात असतं. आज एकूणचं घोषणांची अतिवृष्टी चालली आहे. पण अंमलबजावणी नाही. या निर्दयी सरकारकडे भावनांचा कोरडा दुष्काळ आहे.

कोणीही आलेले नाहीत. कृषीमंत्री, मुख्यमंत्री काय करतायतं? हे फक्त उत्सव साजरे करत आहेत. केवळ उत्सवी सरकार आहे. पण हे उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील प्रजा समाधानी आहे की नाही हे पाहण्याचं राज्यकर्त्याचं काम आहे. म्हणून ज्यावेळी हे सरकार बेदरकारपणे सांगतं की ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, म्हणून मी बाहेर पाहणीसाठी आलो. ही माझी प्रतिकात्मक भेट आहे.

शेतकऱ्यांची ५० हजार हेक्टरची मागणी आहे. मी त्यांच्यावतीने ही मागणी करत आहे. म्हणून मी मुद्दाम सांगतो, ही माझ्या मनातील नाही तर जनातील मागणी आहे. बरं पंचनामे कधी करणार? त्यानंतर तुम्ही ते मदतीचं लंगडं घोडं नाचवणार का? शेतकऱ्यांचा अधिकार नाही का दिवाळी साजरी करण्याचा? त्यामुळे पंचनामे होतील तेव्हा होतील पण आधी मदत जाहीर करा. ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर करायला हवा होता. पण भावनांचा दुष्काळ असल्यामुळे ते करेल असं वाटतं नाही. ते करा किंवा नाही, पण आधी माझ्या शेतकऱ्याला मदत जाहीर करा.

    follow whatsapp