शिवसेना दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत दोन मेळावे पार पडत आहेत. एक मेळावा शिवाजी पार्क मैदानावर तर दुसरा मेळावा बीकेसी मैदानावर होतो आहे. एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे हा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याच्या काही वेळ आधीच एक ट्विट केलं आहे ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे एकनाथ शिंदे यांनी केलेलं ट्विट?
” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे “- हरिवंशराय बच्चन
माझी मुलं ही माझी मुलं आहेत म्हणून माझे उत्तराधिकारी नसतील तर जे माझे उत्तराधिकारी असतील ती माझी मुलं असतील या आशयाच्या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्या आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीवरून निशाणा साधणार हेच या ओळी सांगत आहेत.
एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे
एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी बीकेसीचं मैदान निवडलं आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावरही लोक येत आहेत. शिवसेना दोन गटांमध्ये विभागाली गेल्यापासून हा पहिलाच मेळावा आहे. अशात दोन्ही नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय काय बोलणार? आरोपांच्या कोणत्या फैरी एकमेकांवर झाडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
हिंदुत्वाचा हुंकार दसरा, विचारांचा आधार दसरा, दुर्गेचा आशीर्वाद दसरा, शिवसैनिकांचा विश्वास दसरा! शिवसेनेचा दसरा मेळावा लुटूया सोनं ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचं असं म्हणत एकनाथ शिंदे यांचं एक बॅनरही चर्चेत आहे.
२१ जून २०२२ ला शिवसेनेत उभी फूट
२१ जूनला २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारालं आणि ४० आमदारांना सोबत घेऊन ते गुवाहाटीला गेले होते. शिवसेनेचं पक्ष नेतृत्व म्हणजेच उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत नाहीत हा ठपका एकनाथ शिंदे यांनी ठेवला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यावर होतं जे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. आता शिंदे फडणवीस सरकार आलेलं असताना शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर तर एकनाथ शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहेत.
ADVERTISEMENT











