Adar Poonawalla : लोक कोरोनाला कंटाळले, सिरमने १० कोटी डोस फेकून दिले

मुंबई तक

• 12:33 PM • 21 Oct 2022

Corona Vaccine: २०२० आणि २०२१ या दोन वर्षात भारतासह जगभरात कोरोनाचं मोठं संकट आलं होतं. कोरोनामुळे जगभरात कहर होता. मात्र २०२२ पासून कोरोना कमी झाला. आता अशी स्थिती आहे की कोरोनाला लोक मुळीच घाबरत नाहीत. त्यामुळेच सीरम इन्स्टिट्युटने गेल्या वर्षी कोव्हिशिल्ड लसींचं उत्पादन थांबवलं आहे. सीरमने १० कोटी डोस फेकून दिले सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे […]

Mumbaitak
follow google news

Corona Vaccine: २०२० आणि २०२१ या दोन वर्षात भारतासह जगभरात कोरोनाचं मोठं संकट आलं होतं. कोरोनामुळे जगभरात कहर होता. मात्र २०२२ पासून कोरोना कमी झाला. आता अशी स्थिती आहे की कोरोनाला लोक मुळीच घाबरत नाहीत. त्यामुळेच सीरम इन्स्टिट्युटने गेल्या वर्षी कोव्हिशिल्ड लसींचं उत्पादन थांबवलं आहे.

हे वाचलं का?

सीरमने १० कोटी डोस फेकून दिले

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदर पूनावाला यांनी माहिती दिली की कोरोनाची लाट संपल्यानंतर नागरिकांमध्ये लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत उदासीनता आहे. आम्ही डिसेंबर २०२१ मध्ये कोविशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन थांबवलं आहे. तरीही कोव्हिशिल्डचे १० कोटी डोस एक्स्पायर झाल्याने आम्ही फेकून दिले अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधक लसीपेक्षा फ्लू लसीकरणाबाबतही अधिक उदासीनता आहे. दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी कोरोना आणि फ्लूची लस नियमितपणे घ्यावी लागणार आहे. तसंच कोव्हॅक्सिनचा वापर बूस्टर म्हणून १०-१५ दिवसात मान्यता मिळण्याची शक्यता आहे असंही पूनावाला यांनी सांगितलं.

ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात लस विकसित करण्यासाठी सीरमच्या प्रयत्नांवर पूनावाला म्हणाले की कंपनी यासाठी अमेरिकेच्या नोव्हावॅक्सशी भागीदारी करत आहे. आमची कोवोव्हॅक्स लसीची चाचणी केली गेली आहे. येत्या १०-१५ दिवसात बुस्टर शॉटला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सीरम सध्या अमेरिकन कोडाजेनिक्ससोबत सिंग-डोस इंट्रानेसल कोव्हिड लसीवर काम करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    follow whatsapp