पेट्रोल ओतून अज्ञाताने पेटवल्या तीन गाड्या, रत्नागिरीत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 03:02 PM • 16 May 2024

Ratnagiri: रत्नागिरी तालुक्यात एकाच वेळी तीन गाड्या पेटवल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

पेट्रोल ओतून अज्ञाताने पेटवल्या तीन गाड्या, रत्नागिरीत नेमकं काय घडलं?

पेट्रोल ओतून अज्ञाताने पेटवल्या तीन गाड्या, रत्नागिरीत नेमकं काय घडलं?

follow google news

गोकूळ कांबळे, रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे अज्ञाताने पेट्रोल ओतून तीन गाड्या पेटवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या घटनेने उक्षीसारख्या ग्रामीण भागात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याबाबतची फिर्याद शिवम केळकर (उक्षी, सावंतवाडी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. (three vehicle were set on fire by pouring petrol what really happened in ratnagiri)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उक्षी सावंतवाडी येथे अज्ञाताने दोन दुचाकी आणि एक चारचाकीवर पेट्रोल ओतून 2 स्प्लेंडर आणि एक टोयाटो पेटवून दिल्याचं समोर आलं आहे. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत, तर चारचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

हे ही वाचा>> 'मुर्खपणाचे स्टेटमेंट', मोदींच्या 'त्या' विधानावर पवार भडकले

असे एकूण 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रात्री 11.30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. शिवम केळकर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यामध्ये 30 हजारांचे नुकसान झाले आहे. दोन दुचाकीचे अंदाजे 10 हजार व 5 हजार असे नुकसान झाले आहे.

तर टोयाटो गाडीचे वायर व इतर 15 हजाराचे नुकसान झाले आहे. असे एकूण 30 हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अज्ञातावर ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम 435 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

हे ही वाचा>> Maharashtra Live : अजित पवार महायुतीच्या प्रचारातून गायब, गेले कुठे?

सदर घटनेची माहिती मिळताच उक्षी गावचे उपसरपंच मिलिंद खानविलकर,पोलीस पाटील अनिल जाधव, सावंत गुरव वाडीतील सर्व ग्रामस्थ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाड्यांना लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

    follow whatsapp