मेहुणीने दाजीला 'त्या' गोष्टीबद्दल सांगितलं अन् दोघांनी मिळून रचला भयानक प्लॅन! शेवटी काय घडलं?

दाजी आणि मेहुणीने मिळून एक प्लॅन आखला आणि त्यातून भयानक घटना घडली. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

दोघांनी मिळून रचला भयानक प्लॅन!

दोघांनी मिळून रचला भयानक प्लॅन!

मुंबई तक

• 06:00 AM • 22 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मेहुणीने दाजीला 'त्या' गोष्टीबद्दल सांगितलं अन्...

point

दोघांनी मिळून रचला भयानक प्लॅन!

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: पंजाबमधील नवांशहर (शहीद भगतसिंग नगर) येथून एक खळबळजनक ब्लाइंड मर्डर केस उघडकीस आली आहे. या प्रकरणात नवांशहर चेंबर ऑफ कॉमर्सचे व्हाइस प्रेसिडेंट आणि किराणा दुकानदार रवी सोबती यांची हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून त्यांची गाडी देखील जाळण्यात आली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, कटामागील सूत्रधार घरकाम करणारी सोनम आणि तिचा दाजी सुरजीत सिंग उर्फ जस्सी असल्याचं तपासादरम्यान समोर आलं. 

हे वाचलं का?

गाडीत अर्धवट जळालेला मृतदेह.... 

12 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत रवी सोबती घरी परतला नसल्याने त्याचा मुलगा सुमित सोबती याने नवांशहरमधील शहर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची माहिती दिली. तक्रारीनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि रवी सोबतीच्या मोबाईल फोनचं लोकेशन शोधलं. बलाचौर येथे बेपत्ता व्यक्तीच्या फोनचं लोकेशन आढळलं. पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने बलाचौर पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनास्थळी एक पथक पाठवलं. मात्र, त्या ठिकाणी रवी सोबतीचा अर्धवट जळालेला मृतदेह त्याच्या गाडीत आढळला. मुलाच्या जबाबावरून त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन डीएसपी बलाचौर, डीएसपी नवांशहर, सीआयए स्टाफ आणि दोन्ही पोलिस ठाण्यांचे एसएचओ यांच्यासह अनेक पथके तयार करण्यात आली. टेक्निकल, वैज्ञानिक आणि ह्यूमन इंटेलिजन्सच्या आधारे तपास करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. तपासादरम्यान, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली. 

हे ही वाचा: पती बाहेर गेल्यानंतर आरोपी घरात शिरायचा अन् पीडितेसोबत अश्लील कृत्ये! मुलांसमोर सुद्धा...

तपासात असं समोर आलं की रवी सोबतीच्या घरी काम करणारी सोनम हिने पीडित रवी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचं आपल्या दाजीला सांगितलं. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी, सुरजीत सिंगने रवी सोबतीला याबाबत जाब विचारला आणि त्यामुळे त्यांच्यात भांडण झालं. रवीने त्याचं घर सोडून देण्याची धमकी दिली आणि त्यानंतर शिवीगाळ सुद्धा केली. याच वादातून संतापलेल्या सूरजीत सिंगने रवीच्या हत्येचा कट रचला. 

कशी केली हत्या? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरजीतने मेहुणी सोनमला दुपारी घरी परतण्यास सांगितलं. संध्याकाळी रवी सोबती तिला सोबत नेण्यासाठी आल्यानंतर त्याला रेल्वे क्रॉसिंग 3 जवळील अंडरपासजवळील एका निर्जन भागात नेण्यात येईल, अशी योजना आखण्यात आली. योजनेनुसार, त्याच्या साथीदारांच्या मदतीने रवी सोबतीची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह बलाचौर येथे नेण्यात आला आणि हत्येचा संशय टाळण्याच्या दृष्टीने अपघात दाखवण्यासाठी पीडित रवीच्या गाडीवर पेट्रोल ओतून ती जाळून टाकण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, लवकरच या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात आला आणि त्यांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

    follow whatsapp