पोलीस ठाण्यात महिला वकिलाला विवस्त्र करून लैंगिक छळ, नंतर जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

crime news : एका महिला वकिलाला तब्बल 14 तासांच्या बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आलेल्या कथित प्रकरणाची, तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून लैंगिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्यांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.

sexually harassed

sexually harassed

मुंबई तक

• 02:40 PM • 20 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलीस अधिकाऱ्यांनी महिला वकिलांवर हल्ला केल्याचा आरोप 

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : एका महिला वकिलाला तब्बल 14 तासांच्या बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आलेल्या कथित प्रकरणाची, तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून लैंगिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्यांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणात न्यायालयाने नोएडा पोलिसांकडून  कालावधीसाठी सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण पुढीलप्रमाणे... 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीचे तब्बल 72 तुकडे केले, अंगाचा थरकाप उडवून टाकणारी मर्डर मिस्ट्री

नेमकं काय घडलं? 

एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, एका महिला वकिलाने सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. यात आरोप करण्यात आला की, 3 डिसेंबर 2025 रोजी जेव्हा नोएडात सेक्टर 2025 च्या रात्रीच जेव्हा ती नोएडातील सेक्टर 126 पोलीस टाण्यात एका क्लायंटला मदत करण्यात आली होती, तेव्हा पोलिसांनी तिला अवैधपणे ताब्यात घेण्यात आले होते.

संबंधित महिलेच्या वकिलाचं म्हणणं आहे की, तिला रात्री 12:30 ते दुसऱ्याच दिवशी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कोणत्याही सुमारे कायदेशीर कागदपत्रांशिवाय पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. कायद्यानुसार, कोणत्याही महिलेला दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अटक करता येणार नाही किंवा रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवता येणार नाही.

पोलीस अधिकाऱ्यांनी महिला वकिलांवर हल्ला केल्याचा आरोप 

याच प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी महिला वकिलांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांनी तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न देखील केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संबंधित याचिकेत आरोप करण्यात आला की, पोलिसांनी तिच्या मानेवर सरकारी पिस्तूल रोखण्यात आले आणि तिने आज्ञा न पाळल्यास खोटी धमकी दिली जाईल असं सांगितलं.

हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांच्या प्रेम जीवनात रोमँटिक क्षण येतील, तर काही राशींवर संकटांची टांगती तलवार राहील

या प्रकरणात वकिलांनी आरोप केला की, पोलिसांनी जबरदस्तीने तिच्या मोबाईल फोनचा पासवर्ड घेतला आणि साठवण्यात आलेले पुरावे आणि व्हि़डिओ डिलिट केले. कोणताही डेटा रेकॉर्ड राहू नयेत, यासाठी पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद करण्यात आले होते. तसेच 14 तासांपर्यंत, वकिलाला अन्न, पाणी आणि तिच्या कुटुंबाशी संपर्क देखील साधण्यात आला, तसेच कायदेशीर मदत नाकारण्यात आली.

    follow whatsapp