31 वर्षीय विवाहित महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करत प्रियकरानं संपवलं, त्याच्या घरातच आढळला महिलेचा मृतदेह

Crime News : एका व्यक्तीने 31 वर्षीय विवाहित महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराच्या घरातून महिलेचा मृतदेह जप्त केला, या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं.

crime news

crime news

मुंबई तक

• 07:00 AM • 19 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

31 वर्षीय विवाहित महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

point

प्रियकराच्या घरातून महिलेचा मृतदेह जप्त

Crime News : उत्तर प्रदेशातील बाराबांकीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, एका व्यक्तीने 31 वर्षीय विवाहित महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराच्या घरातून महिलेचा मृतदेह जप्त केला होता. पोलिसांनी मंगळवारी या घटनेबाबत माहिती दिली होती. या घटनेत प्रियकराचे पालक आणि त्याच्या चार बहि‍णींचा सहभाग असण्याची पोलिसांना शक्यता आहे. सध्या, प्रियकराच्या कुटुंबातील सर्व सदस्य फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिलेसोबत हॉटेलमध्ये शरीरसंबंध, नंतर प्रेयसीकडून लग्नाची मागणी अन् वाद, प्रियकराचं गुप्तांग छाटून...

एका महिन्यापूर्वी विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध

पोलिसांनी सांगितलं की, शहापूर येथील रहिवासी संदीपचे एका महिन्यापूर्वी विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी सांगितलं की, ममता ही सोमवारी रात्रीच्या सुमारास संदीपच्या घरी आली होती. तेव्हा संदीपचे आईवडील आणि बहिणी घरी उपस्थित होत्या. तर त्याची पत्नी आपल्या माहेरी गेली होती.

शौचालयासाठी घराबाहेर पडला होता, तेव्हा...

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सकाळी सहा वाजताच्या सुमारास संदीप शौचालयासाठी घराबाहेर पडला होता, तेव्हा सर्व परिस्थिती सामान्य होती. जेव्हा तो परतला तेव्हा त्याला घरात ममताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता आणि तिथेच शेजारी एक कुऱ्हाड पडली होती.

घटनास्थळी पोलीस दाखल 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रेयसीचा मृतदेह रक्ताने माखलेला पाहून तिचा प्रियकर संदीपने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.

हे ही वाचा : जालन्यात 32 वर्षीय तरुणाची नदीत उडी मारत संपवलं जीवन, मृतदेह तरंगत आला पाण्यावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने स्वत: त्याच्या पालकांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. सर्कल ऑफिसर गरिमा पंत यांनी सांगितलं की, घटनेपासून संदीपचे मालक आणि त्याच्या चार बहिणी फरार झाले आहेत. या प्रकरणात पुढे त्यांनी सांगितलं की, मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp