चौघांनी एकत्रित विष प्यायलं, एकाच कंपनीत करायचे नोकरी; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 09:28 AM • 08 Feb 2026

Suicide News : चार तरुणांनी मिळून मक्याच्या शेतात एकत्रितपणे विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. यामधील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. सनी देओल सादा आणि राजा सादा अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे चारही तरुण एकाच डान्स कंपनीशी संबंधित होते.

Suicide News

Suicide News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चौघांनी एकत्रित विष प्यायलं

point

एकाच कंपनीत करायचे नोकरी

Suicide News : चार तरुणांनी मिळून मक्याच्या शेतात एकत्रितपणे विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. यामधील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. सनी देओल सादा आणि राजा सादा अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे चारही तरुण एकाच डान्स कंपनीशी संबंधित होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : भंगारवाला शोरूममध्ये गेला अन् क्षणात कोट्याधीश बनला, आता सगळं उघडकीस!

एकाच विषारी पदार्थाचे सेवन

या घटनेतील मृतांची ओळख राजा सादा आणि सनी देओल सादा अशी पटली आहे. तर 18 वर्षीय मुरारी कुमार आणि 16 वर्षीय सानोज सादा यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यांना तातडीने उपचारासाठी खगडिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चौघांनीही एकाच विषारी पदार्थाचे सेवन केले होते, त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मक्याच्या शेतात घडला प्रकार

पोलीस तपासात असे समोर आले आहे की, ही घटना एका मक्याच्या शेतात घडली. घटनास्थळावरुन पोलिसांनी जप्त केलेल्या बाटलीत हिरव्या आणि निळ्या रंगाचा द्रव पदार्थ आढळून आला आहे. तसेच घटनास्थळी चार प्लास्टिकचे ग्लास देखील सापडले आहेत. हा द्रव पदार्थ एखादे कीटकनाशक असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : तुळजापुरात बारजवळ दोन गटांत हाणामारी; अज्ञाताकडून गोळीबार

विष का प्राशन केले?

सहरसाचे पोलीस अधीक्षक हिमांशु यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण कीटकनाशक सेवनाचे वाटत असले तरी, मृत्यूचे नेमके कारण पोस्ट मार्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या तरुणांनी हे विषारी पदार्थ कोणत्या परिस्थितीत आणि का प्राशन केले याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.