एकीकडे ममता बॅनर्जींचा लढा; तर दुसरीकडे सर्वसामान्य गमावताहेत जीव! SIR सुनावणीला जाताना शिक्षकाच्या कुटुंबाचा करुण अंत

SIR Process : एसआयआरच्या सुनावणीसाठी जाताना एका शिक्षकाला आपली पत्नी आणि 9 महिन्यांची मुलगी गमवावी लागली आहे. कागदपत्रांमधील नावांच्या दुरुस्ती करण्याच्या सुनावणीला ते निघाले होते. त्यासाठी जाताना तिघं ज्या रिक्षातून जात होते त्या रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये त्या शिक्षकाच्या पत्नीचा आणि 9 महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला मृतदेह शवागरात ठेवून सुनावणीसाठी जावे लागले.

SIR Process

SIR Process

मुंबई तक

• 01:24 PM • 08 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकीकडे ममता बॅनर्जींचा लढा तर दुसरीकडे सर्वसामान्य गमावताहेत जीव!

point

SIR सुनावणीला जाताना शिक्षकाच्या कुटुंबाचा करुण अंत

SIR Process : पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेवरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याविरोधात आक्रमकपणे लढा देत आहेत. वकील असल्याने त्यांनी स्वत:च याप्रकरणी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. कोर्टात त्यांनी या प्रक्रियेला 'छळ करण्याचं साधन' असं म्हटलं. या एसआयआर प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेक अधिकाऱ्यांचा कामाच्या तणावामुळं मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या. यामुळे सबंध देशभर गदारोळ माजला. याविषयी आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

हे वाचलं का?

एसआयआरच्या सुनावणीसाठी जाताना एका शिक्षकाला आपली पत्नी आणि 9 महिन्यांची मुलगी गमवावी लागली आहे. कागदपत्रांमधील नावांच्या दुरुस्ती करण्याच्या सुनावणीला ते निघाले होते. त्यासाठी जाताना तिघं ज्या रिक्षातून जात होते त्या रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये त्या शिक्षकाच्या पत्नीचा आणि 9 महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला मृतदेह शवागरात ठेवून सुनावणीसाठी जावे लागले. अशा भयानक पद्धतीने सुखी संसाराचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा :  चक्क हॉटेलमध्ये सापडल्या मतदान पेट्या, अधिकारी म्हणाला, माझी चूक झाली!; सोलापुरात राष्ट्रवादी आक्रमक

सुनावणीसाठी जाताना अपघात

मोहम्मद यासीन अन्सारी नावाचे एक शिक्षक आपली पत्नी हलीमा खातून आणि 9 महिन्यांच्या मुलीसह रिक्षाने अंबजारकडे जात होते. सुस्तानी भागात रिक्षावरील ताबा सुटल्याने तो उलटला आणि मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात हलीमा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या चिमुकल्या मुलीने रुग्णालयात उपचार सुरु असताना प्राण सोडले. आपल्या डोळ्यादेखत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊनही, सुनावणीला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने अन्सारी यांना जड अंत:करणाने मृतदेह शवागारात ठेवून सुनावणी केंद्राकडे धाव घ्यावी लागली.

'बंगालची जनता चोख प्रत्युत्तर देईल'

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून यावरुन राजकीय वादालाही तोंड फुटले आहे. जिल्हा युवा तृणमूल अध्यक्ष प्रसेनजीत दास यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. 'निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असून एसआयआरच्या नावाखाली निष्पापांचे बळी घेतले जात आहेत' असा गंभीर आरोप त्यांनी केला. ही घटना अत्यंत वेदनादायी असून बंगालची जनता अशा कृत्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा : चौघांनी एकत्रित विष प्यायलं, एकाच कंपनीत करायचे नोकरी; नेमकं काय घडलं?

'तृणमूलकडून खोटी भीती पसरवली जातेय'

दुसरीकडे भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावत तृणमूल काँग्रेसवर पलटवार केला आहे. दक्षिण मालदा जिल्ह्याचे भाजप प्रवक्ते अमलान भादुडी यांनी म्हटले की, तृणमूल केवळ मृतदेहांचे राजकारण करत आहे. 'एसआयआर'ची प्रक्रिया कायदेशीर असून, अचूक मतदार यादी तयार होऊ नये यासाठी तृणमूलकडून खोटी भीती पसरवली जात आहे. त्यांनी मृत कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या असल्या तरी, तृणमूल या घटनेचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रचारासाठी करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    follow whatsapp