शास्त्रज्ञाच्या मुलीचे बाथरुममध्येच अंत्यसंस्कार, पाच दिवस घरातच पडून होता मृतदेह, भावाने सांगितली हादरवणारी कहाणी

एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह 5 दिवस घरातच पडून होता. त्यानंतर तिच्या भावाने बाथरूममध्येच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना वास्तू विहार येथील एका निवासी वसाहतीत घडली.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 05:47 PM • 14 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शास्त्रज्ञाच्या मुलीचे बाथरुममध्येच अंत्यसंस्कार

point

पाच दिवस घरातच पडून होता मृतदेह

point

भावाने सांगितली हादरवणारी कहाणी

Crime News : झारखंडच्या धनबादमधील गोविंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह 5 दिवस घरातच पडून होता. त्यानंतर तिच्या भावाने बाथरूममध्येच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना वास्तू विहार येथील एका निवासी वसाहतीत घडली. जेव्हा घरातून तीव्र दुर्गंधी आणि जळाल्याचा वास येऊ लागला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. यामुळे शेजाऱ्यांचे राहणे कठीण झाले होते, त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

हे वाचलं का?

बाथरुममधून जळालेला मृतदेह ताब्यात

माहिती मिळताच गोविंदपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बाथरूममधून जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्या घरात मृतदेह जाळण्यात आला, ते घर सीआयएमएफआर (CIMFR) चे निवृत्त वैज्ञानिक संगीत कुमार यांचे होते, ज्यांचे 2023 मध्ये निधन झाले होते. त्यांची घटस्फोटित मुलगी लिपिका दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये होती आणि एकटीच राहत होती. हळूहळू कुटुंबातील इतर सदस्यही समाजापासून तुटत गेले आणि त्यांनी लोकांपासून अंतर ठेवले होते.

हे ही वाचा : पुणे हादरलं, PhD ची विद्यार्थिनी, गाईडकडून अत्याचार आणि बेडरुममध्ये सगळं संपलं...!

शौचालयात झाला मृत्यू

गोविंदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विष्णू कुमार राउत म्हणाले की, बाथरूममध्ये एक जळालेला मृतदेह सापडला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्ट मार्टम अहवालानंतरच अधिक माहिती स्पष्ट होईल. पोलीस सध्या तपास करत आहेत. लिपिकाचा मोठा भाऊ प्रणव याच्या म्हणण्यानुसार, लिपिकाचा मृत्यू 8 एप्रिलला  झाला होता. तिला वारंवार शौचालयाला होत होते. अशा परिस्थितीत तिची प्रकृती खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार, चुलत भावासह गावातील चौघांचा समावेश; 'असं' बाहेर आलं प्रकरण

'आम्ही अंत्यंसंस्कार केले आहेत'

त्यानंतर प्रणवने आपला धाकटा भाऊ प्रबुद्ध राजवर्धन याला ही माहिती दिली, पण तो आला नाही. कोणीही याकडे गांभीर्याने पाहिले नाही. प्रणवने सांगितले की, बहिणीच्या मृतदेहात कीडे पडले होते, म्हणून त्याने उशी, रजई आणि ब्लँकेटच्या साहाय्याने तिचे अंत्यसंस्कार केले. दुसरीकडे, धाकटा भाऊ प्रबुद्ध राजवर्धन याचे म्हणणे आहे की, त्याच्या भावाने त्याला बहिणीच्या मृत्यूची बातमी दिली होती आणि तो रविवारी (12 एप्रिल) सकाळी अंत्यसंस्काराचे साहित्य घेऊन पोहोचलाही होता. जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याच्या मोठ्या भावाने सांगितले, 'आम्ही अंत्यसंस्कार केले आहेत.' त्यावेळी घरातून कोणतीही दुर्गंधी येत नव्हती.