प्रेमसंबंधातून नवऱ्याचे तुकडे, डिझेलनं जाळला मृतदेह अन् जेसीबीने शेतात पुरला, बायकोच्या प्रेमाचा रक्तरंजित थरार

मुंबई तक

14 Apr 2026 (अपडेटेड: 14 Apr 2026, 04:20 PM)

crime news : महिलेनं प्रेमसंबंधातून पतीची हत्या केली. नंतर मृतदेह जाळून जमिनीत पुरला. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेत अटक केली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेचे पंकज चौधरीसोबत प्रेमसंबंध 

point

मुलांनी उघडकीस आणलं प्रकरण 

Crime News : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये प्रेम प्रसंगातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित प्रकरणात महिलेनं प्रेम संबंधातून पतीची हत्या केली. नंतर मृतदेह जाळून जमिनीत पुरला. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेत अटक केली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव धनराज नाथ (वय 39) असे होते. तसेच हत्या केलेल्या पत्नीचं नाव धापू बाई असे आहे. हे प्रकरण 10 एप्रिल रोजी रात्री घडले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 85 वर्षीय वृद्धाने डॉक्टरांची कार पेटवून दिली, स्वत: देखील भाजला गेला, परिसरात भीतीचे वातावरण

महिलेचे पंकज चौधरीसोबत प्रेमसंबंध 

धापू बाईचे पंकज चौधरीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. नवऱ्याने धापू बाईला विवाहबाह्यसंबंध ठेवण्यावरून अनेकदा विरोध केला. तिचे गावातील पंकज चौधरी नावाच्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. अशातच पत्नीने दुसऱ्याच दिवशी नवऱ्याची हत्या केली. महिलेनं पोलीस ठाणे गाठून नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी काही दिवस तपास सुरु ठेवला होता, अशी पोलिसांची माहिती आहे. 

प्रेमसंबंधातून नवऱ्याची हत्या करत जेसीबीनं खड्डा खणून मृतदेह पुरला

दरम्यान, पंकज चौधरी यांनी हत्या केलेल्या धनराजला बोलावलं होतं. नंतर त्याचा गळा चिरून तिची हत्या केली. नंतर मृतदेहावर डिझेल टाकून जाळून टाकलं, शेतात नेऊन जेसीबीनं खड्डा खणून मृतदेह पुरला. प्रकरणाच्या माहितीदरम्यान, पोलिसांनी पंकज चौधरी आणि मृत व्यक्तीच्या पत्नीवर संशय व्यक्त केला. यानंतर संपूर्ण प्रकरण समोर येऊ लागलं. 

संबंधित प्रकरणात कुटुंबियांच्या मते, तपासानंतर पुढील कारवाई केली जावी. अशातच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जेसीबी ऑपरेटरचा शोध सुरु ठेवला. पोलिसांच्या एका पथकाने पत्नी आणि पंकज चौधरीसोबत घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती मिळवली. 

हे ही वाचा : पुणे हादरलं, PhD ची विद्यार्थिनी, गाईडकडून अत्याचार आणि बेडरुममध्ये सगळं संपलं...!

मुलांनी उघडकीस आणलं प्रकरण 

हा संपूर्ण प्रकार धनराजच्या मुलांनी उघडकीस आणला होता. धनराजच्या अचानकपणे गायब होण्यामागे मुलाला आणि मुलीला त्यांच्या कृतीबद्दल संशय निर्माण झाला. मुलांनी पोलिसांना सांगितलं की, वडील मृत्यूआधी शेवटचे पंकजसोबतच दिसले होते, त्यानंतर ते घरी परतले नाही. पोलिसांनी धापूबाई आणि पंकज यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली, तेव्हा ते खचले आणि त्यांनी गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. नंतर आरोपींच्या निर्देशानुसार, पोलिसांनी जेसीबीने शेत खोदले, तिथे धनराजच्या शरीराचे तुकडे आढळून आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरीन हत्यार जप्त केलं.