तरुणानं अंघोळीचा व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग अन्..

मुंबई तक

08 Aug 2026 (अपडेटेड: 08 Aug 2026, 02:42 PM)

crime news : महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता देशभरात ऐरणीवर येऊ लागला आहे. एका महिलेनं एका दुकानदारावर अंघोळ करतानाचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला, याचाच गैरफायदा घेत आरोपीने पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. पीडितेनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता देशभरात ऐरणीवर

point

महिलेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड

Crime News : महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता देशभरात ऐरणीवर येऊ लागला आहे. एका महिलेनं एका दुकानदारावर अंघोळ करतानाचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला, याचाच गैरफायदा घेत आरोपीने पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. पीडितेनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातील असून घटनेनं परिसर हादरून गेलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना हादरलं! भरधाव कार विहिरीत कोसळली, दोन महिलांचा दुर्दैवी अंत

तरुण पीडितेवर वाईट नजर ठेवून

पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालानुसार, पीडिता एमआयए ठाणे क्षेत्रातील एक दुकान चालवत होती. महिलेच्या दुकानाजवळच आरोपी दुकानदाराचे वेल्डिंगचे दुकान होते. आरोपीचे जवळ दुकान असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. महिलेनं आरोप केला की, आरोपी तरुण हा अधिक काळापासून पीडितेवर वाईट नजर ठेवून होता, तो योग्य वेळ पाहून संधी साधण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीचं दुकान हे शेजारीच असल्याने पीडितेच्या मनात कधीच वाईट विचार आला नाही. 

बाथरूममध्ये अंघोळ करताना व्हिडओ केला रेकर्ड

पीडितेनं आपल्या तक्रारीत सांगितलं की, एक दिवस मी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना, त्या आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. या घटनेची पीडितेला माहिती मिळाली असता, धमकी देण्यात आली. जर पीडितेनं त्याचं म्हणणं न ऐकल्यास तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. नंतर तेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. समाजिक स्तरातील बदनामीला घाबरली असता, आरोपी तिला सतत ब्लॅकमेल करू लागला होता. 

ब्लॅकमेल करून शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती 

पीजितेच्या अनुसार, ब्लॅकमेलिंग दरम्यान, एक दिवस ती गावी जाण्यासाठी निघाली होती. यादरम्यान आरोपीने आपल्या बोलेरो गाडी घेऊन आला. त्याने महिलेला गावापर्यंत सोडवतो असं सांगितलं होतं, मात्र घडलं भलतंच. आरोपीने पीडितेला एका खोलीत नेलं होतं. तिथे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर पीडिता आरोपीच्या कशीतरी ताब्यातून सुटली. 

हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि केतूचा संयोग, 'या' राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल

घटनेनंतर पीडितेनं आपल्या कुटुंबासोबत पोलीस ठाण्यात गेली. आरोपीविरोधात लिखित स्वरुपात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या अहवालानुसार, आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस ठाण्याचे म्हणणं असंय की, पीडितेचं मेडिकल तपास केला जाणार असून न्यायालयात जबाब नोंदवला जाईल.