85 वर्षीय वृद्धाने डॉक्टरांची कार पेटवून दिली, स्वत: देखील भाजला गेला, परिसरात भीतीचे वातावरण

Crime News : एका 85 वर्षीय वृद्धाने डॉक्टरच्या घराबाहेरील पार्क केलेल्या कारला कथितरित्या आग लावली. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात घबराट पसरल्याचं चित्र आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पूर्वी त्या डॉक्टरच्या दवाखानात काम करत होता. या घटनेनं स्थानिकांमंध्ये भीतीचे वातावरण तयार झाले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 02:29 PM • 14 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरांच्या घरासमोर पार्क केलेल्या गाडीला आग लावल्याची माहिती

point

चेलप्पनने असं का केलं असाव?

Crime News : केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील गांधीनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका 85 वर्षीय वृद्धाने डॉक्टरच्या घराबाहेरील पार्क केलेल्या कारला कथितरित्या आग लावली. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात घबराट पसरल्याचं चित्र आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पूर्वी त्या डॉक्टरच्या दवाखानात काम करत होता. या घटनेनं स्थानिकांमंध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात तपास सध्या सुरू झाली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अक्षय्य तृतीया रोजी दुर्मिळ योग, 'या' राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, तर काही अविवाहितांचे हात मेहंदीने रंगणार

डॉक्टरांच्या घरासमोर पार्क केलेल्या गाडीला आग लावल्याची माहिती

अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 8:10 वाजता, कोट्टायम अग्निशमन केंद्राला एका डॉक्टरांच्या घरासमोर पार्क केलेल्या गाडीला आग लावल्याची माहिती मिळाली होती. गाडी घराच्या शेडमध्ये पार्क करण्यात आली होती आणि नंतर ती आग वेगाने पसरू लागली. त्याचदरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळपणे प्रतिसाद देत आग विझवण्याचे काम सुरु ठेवले.  

चेलप्पनने असं का केलं असाव?

संबंधित प्रकरणात तपासातून असे उघडकीस आले की, चेलप्पन नावाचा 85 वर्षीय वृद्ध  व्यक्ती डॉक्टरांच्या घरी आला आणि त्याने गाडीला आग लावली. या घटनेत तो भाजून निघाला, उपचारासाठी त्याला तात्काळपणे कोट्टायम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. चेलप्पनने असं का केलं असाव? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  या घटनेनं मोठा धक्का बसल आहे. 

हे ही वाचा : थेट पंचायत समिती कार्यालयात घुसली महिला अन् थेट घातला अधिकाऱ्याच्या कॉलरला हात..

सुमारे 45 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. नंतर गांधीनगर पोलिसांनी तपास सुरु केला असून ते या प्रकरणाचा खुलासा करत असल्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांकडून तक्रार मिळाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी पोलिसांची माहिती आहे.