Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गुजरात मधील सुरत येथे 14 वर्षांच्या सावत्र मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीला सतत पोटदुखीचा त्रास होत असल्याने तिच्या कुटुंबाने तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते. तेथे डॉक्टरांनी ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे सांगताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT
आठ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार
गर्भावस्थेची माहिती समोर आल्यानंतर आईने मुलीकडे चौकशी केली असता घडलेला संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने सांगितले की, गेल्या आठ महिन्यांपासून सावत्र वडील तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करत होते. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी आरोपी देत होता, त्यामुळे भीतीपोटी ती गप्प राहिली आणि हा त्रास सहन करत राहिली.
हे ही वाचा : 'एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात हवा गेलीये' असं मनोज जरांगे पाटील का बोलले?
पतीविरुद्ध तक्रार दाखल
या खुलाशानंतर पीडितेच्या आईने तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (पूर्वीचे आयपीसी) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा : बीडमध्ये तब्बल दोन कोटींचं बनावट खाद्य तेल कसं तयार करण्यात आलं?
पोलीस तपासात काय?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने सुमारे 10 वर्षांपूर्वी पहिल्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर आरोपीशी दुसरे लग्न केले होते आणि ती मुलीला सोबत घेऊन आली होती. तेव्हापासून आरोपी सावत्र वडील म्हणून कुटुंबासोबत राहत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडित मुलीवर आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT












