मित्र म्हणाले, “हा मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही…'', तरुणाने 6 वर्षांच्या मुलाला घातले नवे कपडे अन्...

मुंबई तक

14 Apr 2026 (अपडेटेड: 14 Apr 2026, 01:40 PM)

Karad Crime: संशयाच्या विळख्यात अडकलेल्या जन्मदात्या पित्यानेच आपल्या 6 वर्षीय निष्पाप मुलाचा हत्या केल्याची धक्कदायक घटना ही कराडमध्ये घडली आहे.

friends remarked this boy doesnt look like you Young man murders his own son

crime news

Google CTA

कराड: कराड तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जिथे जन्मदात्या बापानेच आपल्या 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे. संशय, अहंकार आणि विकृत मानसिकतेच्या गर्तेत अडकलेल्या या बापाने आपल्या लेकरालाच मृत्यूच्या दारात ढकललं. तब्बल 20 दिवसांनी या थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

18 मार्च… सकाळची वेळ… कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ओळख पटत नसलेलं हे प्रकरण पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं होतं. पण सातत्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण आणि दोन राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून अखेर या मृत्यूमागचं भयानक सत्य समोर आलं.

हे ही वाचा>> बीड : दुसरी बायको माहेरी गेली, सावत्र मुलीला पाहून बाप सैतान बनला, घरातच जबदरस्तीने लैंगिक अत्याचार

हा मृतदेह होता कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरेकरी (वय 6) या निष्पाप मुलाचा.

आरोपी हा दुसरा-तिसरा कोणी नसून स्वतः जन्मदाता बाप आहे. मल्लिकार्जुन आरेकर यानेच आपल्या मुलाला थंडपणे मृत्यूकडे ढकललं.

पोलीस तपासात उघड झालं की, 16 मार्च रोजी आरोपीने पत्नीला “मुलाला शाळेत ॲडमिशनसाठी घेऊन जातो” असा बहाणा केला. त्यानंतर तो विजापूरहून थेट कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात आला आणि नंतर शिवडे गावाच्या हद्दीत निर्जन कृष्णा नदीकाठी संधी साधत आपल्या ६ वर्षांच्या मुलाला थेट नदीत फेकून दिलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या अमानुष कृत्यापूर्वी त्याने मुलाला नवीन कपडे घातले होते. आणि खून केल्यानंतर तो शांतपणे घरी परतला, जणू काहीच घडलं नाही!

हे ही वाचा>> 'मधुचंद्राच्या रात्री...,' नवविवाहितेची नको तीच अट, नवरदेवाला फुटला घाम, पुढं भयंकर घडलं

या निर्दयी कृत्यामागचं कारण ऐकून संताप अनावर होतो. मित्रांकडून होणारी चेष्टा “हा मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही… तुझा नाही…”या शब्दांनी आरोपीच्या मनात संशयाचं विष पेरलं. त्यामुळे तो पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत होत होता.

दीड वर्षापासून सुरू असलेले वाद आणि अखेर त्या संशयाचं रूपांतर थेट खुनात!

दरम्यान, 1 एप्रिलला सिद्धार्थचा वाढदिवस होता. आई भाग्यश्रीने मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क न झाल्याने संशय बळावला. वारंवार विचारूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने थेट पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच तक्रारीनंतर कर्नाटक पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि अखेर आरोपीचा खोटा बनाव उघड झाला.

कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. कर्नाटकातील विजापूर पोलिसांनी त्याला अटक केली असून घटनास्थळी आणून पंचनामा देखील करण्यात आला आहे.

एका विकृत संशयामुळे गेला चिमुकल्याचा जीव…

ही घटना केवळ कराड किंवा विजापूरपुरती मर्यादित नाही. तर संपूर्ण समाजमन हादरवणारी आहे. संशय, अहंकार आणि मानसिक विकृती यांचं संगनमत किती भयंकर असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. आता या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे.