मुंबई जवळच्या 'या' जिल्ह्यात लव्ह जिहाद?, बनावट ‘हिंदू’ ओळखीमुळे लग्न अन्..

Palghar Crime: बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख या आरोपीने “अजय म्हस्के” या बनावट हिंदू नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करून 29 वर्षीय महिलेशी लग्न करून तिची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

29 year old woman alleges love jihad in palghar district near mumbai accused deceives young woman into marriage using a fake hindu identity

Plaghar Crime News

मुंबई तक

14 Apr 2026 (अपडेटेड: 14 Apr 2026, 11:44 AM)

follow google news

पालघर, मो.हुसेन खान : पालघरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट ओळख वापरून एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. (29 year old woman alleges love jihad in palghar district near mumbai accused deceives young woman into marriage using a fake hindu identity)

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख या आरोपीने “अजय म्हस्के” या बनावट हिंदू नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट तयार केले. त्याद्वारे त्याने 29 वर्षीय महिलेशी ओळख वाढवली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला.

हे ही वाचा>> बीड : 1143 शब्दांची सुसाईड नोट, तरुणाचा पत्नीकडून अनन्वित छळ, अन् काळीज पिळवटणारी गझलही केली शेअर

यानंतर आरोपीने पीडितेला मंदिरात नेऊन खोटे लग्न केल्याचा बनाव केला. सहा महिन्यांच्या काळात तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर आरोपीच्या पत्नीने अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा देखील खळबळजनक आरोप केला आहे.

या प्रकरणी घाबरलेल्या पीडित महिलेने केळवे सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा>> 'माझी नाही झालीस तर कोणाचीच नाहीस', तरुणीने लग्नास दिला नकार, तरुणाने पीडितेला HIV चं इंजेक्शन दिलं, पुढे भयंकर...

विशेष म्हणजे, पीडित महिलेने इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावरून तरुणी व महिलांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी, असे तिने स्पष्ट केले आहे.