Crime News : एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पाच जणांमध्ये पीडित मुलीच्या चुलत भावाचाही समावेश असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री घडलेली ही घटना सोमवारी (13 एप्रिल) सकाळी उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी तत्परतेने तातडीने पावले उचलत कारवाईला सुरुवात केली आहे. बिहारच्या गया परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
शौचाला जाताना अडवले
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रात्रीच्या वेळी घराबाहेर शौचासाठी गेली असता, पाच जणांनी तिला अडवले. यात चार गावकरी आणि एका समारंभामध्ये डेकोरेशन करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचाही समावेश होता. त्यांनी मुलीचे तोंड दाबून तिला ओढत निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. घटनेनंतर नराधमांनी मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, मात्र घरी पोहोचताच तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
हे ही वाचा : थेट पंचायत समिती कार्यालयात घुसली महिला अन् थेट घातला अधिकाऱ्याच्या कॉलरला हात..
चौघांना अटक, एकजण फरार
पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अखिलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सनोज, अनुज, शिशुपाल आणि साजन या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पाचव्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके छापेमारी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण तीन मुलांचा बाप आहे.
हे ही वाचा : मुंबई : ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धक्कादायक प्रकार, पाच जण अटकेत
घटनास्थळावर रक्ताचे डाग
या गंभीर प्रकरणाची दखल घेत शेरघाटीचे डीएसपी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली आहे. घटनास्थळावर रक्ताचे डाग आढळले असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनी त्याचे नमुने घेतले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, फरार असलेल्या शेवटच्या आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











