प्रेयसीला स्मशानभूमीत नेऊन का संपवले? रजनीशच्या आयुष्यात काय घडलं?

मुंबई तक

• 09:50 AM • 30 May 2026

प्रियकर आणि प्रेयसी दोघांनी मिळून आधी मद्यपान केले. त्यानंतर चिकन खाल्ले. मात्र दोघांमध्ये जीवघेणा वाद झाला अन् होत्याचं नव्हतं झालं.

Crime News

Crime News

Google CTA

Crime News : अनैतिक संबंधांमधून एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुस्कान असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या प्रियकरानेच, म्हणजेच रजनीश ऊर्फ गब्बरने तिची हत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मुस्कानच्या बेजबाबदार वागण्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात वाद निर्माण होत असल्याने, त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी रजनीशला अटक करून न्यायालयात हजर केले, तिथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

स्मशानभूमीत आढळला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्खीपुरा येथील रहिवासी अब्दुल वाहिद यांची पत्नी मुस्कान हिचा मृतदेह पुठा येथील स्मशानभूमीत आढळून आला होता. तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी मुस्कानची ओळख पटवली. हत्येपूर्वी तिने ज्या पाच क्रमांकांवर संपर्क साधला होता, त्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शिवपुरम येथील रजनीश ऊर्फ गब्बर याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

हे ही वाचा : मुंबईची खबर : CNG चा दर पुन्हा वाढला, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

मद्यपान आणि हत्या

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, 26 जून रोजी मुस्कानचे तिच्या नवऱ्यासोबत इतर पुरुषाशी बोलण्यावरून कडाक्याचे भांडण झाले होते, ज्यामध्ये तिच्या नवऱ्याने तिचा मोबाईल तोडला होता. त्यानंतर मुस्कानने शेजारी राहणाऱ्या निशा नावाच्या महिलेकडून 300 रुपयांत एक जुना मोबाईल खरेदी केला. परंतु त्यात नेटवर्क येत नसल्याने ती पुन्हा निशाकडे गेली आणि तीनशे रुपये परत मागितले. पैसे नसल्यामुळे तिने गॅस सिलिंडर देऊ केला. याच दरम्यान तिने निशाच्या मोबाईलवरून प्रियकर रजनीशशी संपर्क साधला. रजनीश तिला मोपेडवरून घेऊन आपला मित्र राहुल कटारिया याच्या घरी गेला. तिथे राहुल, रजनीश आणि मुस्कान यांनी एकत्र मद्यपान केले आणि चिकन खाल्ले.

हे ही वाचा : समजून घ्याः बांगलादेशी भारतात घुसतात कसे? पाहा कोणी केला भांडाफोड

कुटुंबातील रोजच्या भांडणाला कंटाळला

दारूच्या नशेत मुस्कान आणि रजनीश यांच्यात वाद सुरू झाला, ज्यामध्ये रजनीशने तिला मारहाण केली. राहुलच्या पत्नीने दोघांना घरातून हाकलून लावल्यानंतर, रजनीश मुस्कानला पुठा येथील स्मशानभूमीत घेऊन गेला. तिथे त्याने तिला पुन्हा दारू पाजली आणि ती पूर्ण नशेत असताना तिच्याच ओढणीने गळा दाबून तिचा खून केला. हत्येनंतर तो शांतपणे घरी जाऊन झोपला. रजनीशने सांगितले की, त्यांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते, परंतु मुस्कान दारू पिऊन कधीही फोन करायची, ज्यामुळे त्याच्या बायको आणि मुलांसमोर हे प्रकरण आले होते. कुटुंबात रोज होणाऱ्या भांडणांना कंटाळून आणि आपले कुटुंब वाचवण्यासाठी त्याने मुस्कानचा काटा काढला.