प्रेमाच्या वाटेत पतीचा काटा, प्रियकरासोबत मिळून केली हत्या, केवळ 40 हजारांची सुपारी

मुंबई तक

• 03:05 PM • 24 Jul 2026

crime news : पतीची हत्या केल्याचा आरोप पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आहे. दोन महिने ब्लाइंड मर्डर राहिलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा करत पाच जणांना अटक केली आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेमाच्या वाटेत पतीचा काटा

point

प्रियकरासोबत मिळून केली हत्या, केवळ 40 हजारांची सुपारी

Crime News : एका महिलेने तिच्या कथित प्रियकरासोबत संगनमत करून केवळ 40 हजार रुपयांच्या मोबदल्यात स्वतःच्या पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार समोर आलाय. जवळपास दोन महिन्यांपासून पोलिसांसाठी हा ब्लाइंड मर्डर ठरत होता. मात्र, कॉल डिटेल्स आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात मृताच्या पत्नीसह तिचा कथित प्रियकर आणि हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून, हत्येत वापरण्यात आलेली कार आणि शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

सुरुवातीला रस्ते अपघात झाल्याचे वाटले, मात्र नंतर झाला खुलासा

डीएसपी फतेहगड चूडियां ललित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी महामार्गावर एका कारमध्ये पिंका नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे वाटत होते. मात्र शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. अहवालातील निष्कर्षांनंतर पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक माहिती आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्यात आली. तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आणि मृताच्या जवळच्या व्यक्तींनीच हा कट रचल्याचा पोलिसांना संशय आला. पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला येथे ही घटना घडली.

हेही वाचा : दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा, राहुल गांधी भडकले

रेखा हिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध

तपासादरम्यान मृताची पत्नी रेखा हिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या आरोपानुसार, रेखाने तिच्या कथित प्रियकरासह आणखी तीन जणांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. या हत्येसाठी आरोपींना 40 हजार रुपयांचे आमिष दाखविण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. तांत्रिक तपास, चौकशी आणि गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींना अटक करण्यात आली. या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यात डिजिटल आणि भौतिक पुराव्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दोन महिने ब्लाइंड मर्डर म्हणून राहिलेल्या प्रकरणाचा उलगडा

या प्रकरणात पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि आणखी तीन आरोपी अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली कार आणि शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या चौकशीतून इतर बाबींचाही शोध घेतला जात आहे. हत्या नेमकी कधी आणि कशा प्रकारे आखण्यात आली, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. दोन महिने ब्लाइंड मर्डर म्हणून राहिलेल्या या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर बटाला पोलिसांनी याला त्यांच्या तपासातील मोठे यश मानले असून, या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.