Crime News : छत्तीसगढच्या भिलाईमध्ये एका तरुणाने 19 वर्षीय तरूणीला लग्नाची मागणी केली. तरूणीने लग्नास नकार दिला. नंतर पीडितेनं तरुणाचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्याचा आरोप आहे. तरुणाने तिच्या पीजीच्या खोलीत शिरून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली, नंतर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईत पोलिसांच्या व्हॅनमध्ये विद्यार्थी, तरूणानं बाहेरून कडी खोलली; Video व्हायरल
हे प्रकरण छत्तीसगढ दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील आहे. ती बेमेतरा येथील रहिवासी असून खुशी साहू ही भिलाईमध्ये पीजीमध्ये राहत होती. तिचे फार्मसीचे शिक्षण सुरू होते. दुर्ग एएसपी सिटी सुखनंदन राठोडने सांगितलं की, लोकेश्वर साहू (वय 24) बलौदाबाजार येथील रहिवासी असून तो तरूणीशी विवाह करू इच्छित होता.
तरूणी आणि तरूण एकमेकांचे लांबचे नातेवाईक
दोघेही पूर्वीपासून एकमेकांच्या ओळखीचे होते, ते एकमेकांचे लांबचे नातेवाईक देखील होते. तरूणीने लग्नाला नकार दिला असता, नंतर आरोपीला मोबाइवर ब्लॉक केलं. त्याच्याशी पूर्णपणे बोलणं बंद केलं. पोलिसांचं म्हणण असे की, मोबाइल फोन ब्लॅॉक केल्यानंतर आरोपीने पीडितेच्या पीजी खोलीत शिरून तिची हत्या केली.
तरूणाकडून पीडितेच्या पाठीवर आणि पोटावर सपासप वार
तपासातून समोर आले की, आरोपी हा सुरूवातीपासून चाकू घेऊन आला होता. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी दोन शर्ट आणि पँटच्या आतील बाजूल बरमुडा परिधान केला होता. खोलीत पोहोचल्यानंतर त्याने तरुणीचा गळा दाबला आणि नंतर चाकूने पाठीवर, पोटावर हातापायावर वार केले. पोलिसांच्या माहितीनुसार, तो चार मिनिट खोलीत बंद होता आणि खूनानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
हे ही वाचा : पोलिसांचा ड्रग्जप्रकरणी 'तो' व्हिडिओ, राज ठाकरेंनी धरलं धारेवर
काही वेळानंतर मृत तरुणीची मैत्रीण रूममेटमध्ये होती, मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली, नंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मृत तरुणीच्या हत्येची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपीला अटक केली.
ADVERTISEMENT












