नवऱ्याला दारूसाठी पैसे देण्यास नकार, बायकोची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला

मुंबई तक

• 04:42 PM • 22 Jul 2026

Crime News : घरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासातून समोर आले की, या घटनेपूर्वी दारूच्या पैशांवरून पती-पत्नीत वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. नंतर शवविच्छेदन अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतर मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट झाले.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घरात सुटकेसमध्ये बायकोचा मृतदेह

point

नवऱ्याला दारूसाठी पैसे देण्यास पत्नीचा नकार आणि खून

Crime News : राजस्थानच्या झुंझुनू येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. घरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासातून समोर आले की, या घटनेपूर्वी दारूच्या पैशांवरून पती-पत्नीत वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. नंतर शवविच्छेदन अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतर मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट होईल. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बदलापूर: साडी घेऊन देण्याचा वाद, बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात कुकर घालत संपवलं

घरात सुटकेसमध्ये बायकोचा मृतदेह

ही घटना झुंझुनू जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाणे परिसरातील हद्दीतील अगवाना खुर्द गावातील आहे. गावातील एका घरात ट्रंकमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा सुटकेस उघडण्यात आली असता, महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेची सिलोचना फोगट अशी ओळख समोर आली आहे. 

सुरजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी राम सिंह यादव यांच्या म्हणण्यांनुसार, प्राथमिक तपासातून समोर आले की, दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचे दिसून येते. महिलेचे दोन्ही हात बांधलेले आढळून आलेले आहेत. नंतर पोलिसांनी संपूर्ण घटनेची तपासणी केली आणि सर्व आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले होते. 

हे ही वाचा : दिल्लीच्या आंदोलनात मनोज जरांगे, अभिजीत दिपकेशी काय चर्चा?

नवऱ्याला दारूसाठी पैसे देण्यास पत्नीचा नकार आणि खून

पोलिसांच्या माहितीनुसार, सिलोचनाला तिचा पती कृष्णा कुमार जाटने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. तिने पैसे देण्यास नकार दिला होता, यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, महिलेची हत्या करण्यात आली होती. आरोपीने ही घटना कोणालाही कळू नये म्हणून मृतदेह एका ट्रंकमध्ये ठेवला होता. पोलीस हत्येचा एकूण तपास सुरू करत आहेत.