गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या, कुटुंबियांचा आरोप कुणावर?

मुंबई तक

• 04:17 PM • 22 Jul 2026

राजस्थानमधील अलवर येथील एका नवविवाहित जोडप्याचे मृतदेह उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या जोडप्याचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते आणि ती महिला तीन महिन्यांची गर्भवती होती.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या

point

कुटुंबियांचा आरोप कुणावर?

Crime News : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एका नवविवाहित दांपत्याचा उत्तर प्रदेशातील जंगलात मृतदेह आढळला आहे. बिजनौर येथील जंगलात संशयास्पद स्थितीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सतविंदर सिंग आणि त्यांची गरोदर पत्नी अमनदीप कौर अशी मृतांची नावे असून, त्यांच्या लग्नाला अवघे सहा महिने झाले होते. सुमारे 15 दिवसांपूर्वी अमनदीप आपल्या माहेरी बिजनौरला गेली होती. तिला परत आणण्यासाठी सतविंदर 15 जुलै रोजी बिजनौरला पोहोचला होता. दुसऱ्या दिवशी दोघेही मोबाईल दुरुस्तीच्या बहाण्याने घराबाहेर पडले, मात्र सायंकाळनंतर दोघांचेही मोबाईल बंद आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

हे वाचलं का?

घातपाताचा संशय

17 जुलै रोजी पोलिसांना रस्त्याकिनारी त्यांची चावी असलेली बाईक आणि बॅग सापडली. त्यानंतर जंगलात राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान मध्यरात्री एका झाडाला दोन्ही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पतीचा मृतदेह पत्नीच्या ओढणीने, तर पत्नीचा मृतदेह पतीच्या पगडीने बांधलेला होता. घटनास्थळी दोघांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि सामान सुरक्षित तसेच पडून होते. केवळ दोघांचे मोबाईल फोन फुटलेल्या अवस्थेत आढळले. कोणतीही लूटमार झाली नसल्याने हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : बदलापूर: साडी घेऊन देण्याचा वाद, बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात कुकर घालत संपवलं

महिलेच्या गुप्तांगावर दुखापतीच्या खुणा

या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ज्या झाडाच्या फांदीला मृतदेह लटकलेले होते, ती अतिशय बारीक आणि खाली झुकलेली असल्याने तेथे आत्महत्या करणे शक्य नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसेच दोघांचे पाय जमिनीवर टेकलेले व दुमडलेले होते आणि हातही बांधलेले होते. मृत महिलेच्या शरीरावर आणि गुप्तभागावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार करून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आणि नंतर मृतदेह झाडाला टांगल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हे ही वाचा : तुम्हाला माहितीए 'या' 3 आंदोलनांनी अवघ्या भारताचं राजकारणचं कसं बदललं?

मृत्यूचे खरे कारण काय?

शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी आणून शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे. सध्या तरी सामूहिक बलात्कार किंवा हत्येची अधिकृत पुष्टी पोलिसांनी केलेली नाही. फॉरेन्सिक पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे आणि दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी दोन्ही पीडित कुटुंबांकडून केली जात आहे.