पोटच्या मुलाचा वडिलांवर रॉडने हल्ला, बापाला झटक्यात संपवलं

मुंबई तक

21 Jul 2026 (अपडेटेड: 21 Jul 2026, 06:33 PM)

Crime News : पोटच्या मुलानेच वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या केली. मृत व्यक्ती अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. मृत व्यक्तीचं वय वर्षे हे 58 आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाचं वय वर्षे 38 आहे. संबंधित प्रकरणातील आरोपी हा नेपाळचा मूळ नागरिक आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला

point

वडिलांना लेकानं सपवलं

Crime News : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून पोटच्या मुलानेच वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला करत हत्या केली. मृत व्यक्ती अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. मृत व्यक्तीचं वय वर्षे हे 58 आहे. हल्ला करणाऱ्या तरुणाचं वय वर्षे 38 आहे. संबंधित प्रकरणातील आरोपी हा नेपाळचा मूळ नागरिक आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मोदींना वाटते कोणतीही उत्तरे न देता...' राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

नेमकं काय घडलं? 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख चंद्र बहादुर शाही (58) म्हणून समोर आली. चंद्र बहादुर हे आधी सोमापुरा गेटनजीक सुरक्षा गार्ड म्हणून काम करत होता. त्यांनी नुकत्याच झालेल्या शुक्रवारी ट्रेंड स्क्वेयर अपार्टमेंमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला सुरूवात केली होती. रविवारी सकाळी 38 वर्षीय मुलगा द्रोणा हा आपल्या सेक्युरिटी गार्डच्या नोकरीच्या शोधात अपार्टमेंट परिसरात पोहोचला होता. 

लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला करत लेकानं सपवलं

हा प्रकार सोमवारी सायंकाळी 7 वाजता घडला होता. अपार्टमेंट परिसरात त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की, आरोपी द्रोणाने रागाच्या भरात लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली, वडील गंभीरपणे जखमी झाले आणि खाली पडले. मात्रा, काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : पीएम मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचा ठिय्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी

हा धक्कादायक प्रकार बंगळुरूच्या वर्तूर पोलीस ठाणे परिसरातील आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, एक पथक तात्काळपणे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेतला आणि मृतदेह ताब्यात घेत शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी गंभीर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. द्रोणा नावाच्या नेपाळी नागरिकाला अटक करण्यात आली.