अनैतिक संबंधाचा संशय, पत्नीची कात्रीचे वार करुन हत्या; घर बंद करुन पती फरार

मुंबई तक

• 03:54 PM • 20 Jul 2026

crime news : पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीने तिची कात्रीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या मदतीने मुरादाबादमधून अटक केली.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधाचा संशय

point

पत्नीची कात्रीचे वार करुन हत्या; घर बंद करुन पती फरार

Crime News : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत एका पतीने तिच्यावर कात्रीने सपासप वार करून तिची हत्या केली. ही घटना घडल्यानंतर आरोपीने घर बंद करून घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे मुरादाबाद येथून आरोपीला अटक केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, ही घटना 16 जुलैच्या सायंकाळी घडली. सायंकाळी सुमारे 7.32 वाजण्याच्या सुमारास गौतमपुरी भागात एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'जिथे तर्क आणि तथ्य असतात..', पीएम मोदींचा युवकांना संदेश; '56 वर्षीय तरुणाला' टोला

महिला घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळली 

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे 45 वर्षीय महिला घराच्या आत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिला तातडीने जग प्रवेश चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. त्यानंतर सीलमपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी गुन्हे शाखा तसेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले. तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून तेथून महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा केले.

हेही वाचा : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोबा गर्दी, ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडीओ पाहाच VIDEO

पत्नीची हत्या करुन सलीम बेपत्ता 

तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, घटनेनंतर महिलेचा 52 वर्षीय पती सलीम घरातून बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर गेला आणि त्याचा शोध सुरू करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. तपासादरम्यान आरोपीचे लोकेशन उत्तर प्रदेशातील मुरादाबाद परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शनिवारी मुरादाबाद रेल्वे स्थानकाजवळून आरोपीला ताब्यात घेतले. 

चौकशीदरम्यान आरोपी सलीमने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. पत्नीचे तिच्या एका माजी सहकाऱ्यासोबत कथित अवैध संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दिल्लीतील या घटनेच्या दिवशीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने पत्नीवर कात्रीने अनेक वार केले. त्यानंतर घराला कुलूप लावून तो फरार झाला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली कात्री तसेच रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हत्येशी संबंधित सर्व पैलूंची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.