तरूणीचा लग्नास नकार; प्रियकराने भावासह वडिलांची बोटे तोडली

मुंबई तक

• 01:48 PM • 19 Jul 2026

Crime News : लग्नाचा प्रस्ताव धुडकवल्याने सनकी प्रियकराने तरूणीच्या कुटुंबियांना संपवण्याचा विडाच उचलला. आरोपीने आपल्या साथीदारांशी भेटून तरुणीचे वडील आणि तिच्या भावाचे अपहरण केले. यानंतर दोघांच्या पायात साखळदंड बांधण्यात आले होते.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणीने लग्न करण्यास दिला नकार 

point

तरूणाने वडिलांसह भावाचं केलं अपहरण 

point

वडिलांसह भावाची बोटे तोडली

Crime News : केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचा प्रस्ताव धुडकवल्याने सनकी प्रियकराने तरूणीच्या कुटुंबियांना संपवण्याचा विडाच उचलला. आरोपीने आपल्या साथीदारांशी भेटून तरुणीचे वडील आणि तिच्या भावाचे अपहरण केले. यानंतर दोघांच्या पायात साखळदंड बांधण्यात आले होते. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी ओलीस ठेवलेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला.  तेथील परिस्थिती पाहून सुरक्षा यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पाण्यावरून वाद, महिलेला भररस्त्यात मारहाण; विवस्त्र करत व्हिडिओ व्हायरल

तरुणीने लग्न करण्यास दिला नकार 

ही घटना केरळातील वर्काला येथील नागरूर परिसरात घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वडस्सेरीकोनम येथील रहिवासी असलेले अनिल कुमार यांनी मुलीचा विवाह मुख्य आरोपी सुधीशसोबत करण्यास नकार दिला होता. अशातच संतापलेल्या सुधीशने साथीदारांसोबत मिळून बदला घेण्यासाठी कट रचला होता. 

तरूणाने वडिलांसह भावाचं केलं अपहरण 

आरोपी सुधीशने सर्वप्रथम अनिल कुमारला नोकरीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्याने अनिलला एका निर्जनस्थळी ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या घरात बोलावले होते. अनिल कुमार हा घटनास्थळी पोहोचताच सुधीश आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून बंदुकीचा धाक धाकवून अपहरण केले.

हे ही वाचा : 'सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही...' वांगचुक यांच्या पत्नीची उच्च न्यायालयात धाव

वडिलांसह भावाची बोटे तोडली

अनिल कुमारला एका खोलीत नेऊन त्याचे पाय साखळ दंडांनी बांधले. नंतर त्यांच्यावर अत्यंत अमानुषपणे अत्याचार केले होते. अनिल यांना ओलीस ठेवल्यानंतर आरोपींनी त्यांचा मुलगा अचू याला चाकूचा धाक दाखवून निर्जनस्थळी बोलावले.  त्याच ठिकाणी वडील-भावाला बेदमपणे मारहाण करण्यात आली होती. अशातच आरोपीवर हल्ला करण्यात आला होता. भावासह वडिलांची बोटे तोडण्यात आली. संबंधित प्रकरणात दोघेही गंभीरपणे जखमी झाली होती. या भीषण मारहाणीत वडिलांचा हात तुटला, जर मुलीसोबत सुधीशचा विवाह न लावल्यास बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिली.