Crime News : कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बांटवाल परिसरात गुरूवारी KSRT बस स्थानकावर तरूणीवर दुसऱ्या तरुणाने धारदार हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाने पीडितेवर हल्ला करण्यामागील कारण समोर आलेलं आहे. तरुणाने तरुणीला प्रपोज केलं, मात्र तरूणीने नकार दिल्याने आरोपीने रागाच्याभरात तरुणीवर हल्ला केला. मृत तरुणीची लावण्या (वय 21) अशी ओळख समोर आली. तर आरोपीची चेतन (वय 22) अशी ओळख समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'तो माझ्यासोबत नको तेच करायचा', सुनेनं सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेड मारलं
प्राथमिक माहितीनुसार, लावण्या ही KSRT बस स्थानकावर उभी होती. चेतन हा कारमधून आला होता, तो तिच्या बसमध्ये चढला. बसमध्ये लावण्याने कथितरित्या फोन करून आपल्या नातेवाईकांना या घटनेबाबत सांगितलं. तिच्या बाजूला एक तरुण बसला, नंतर तिने फोन कट केला.
लावण्याने प्रपोजला नकार दिल्याने चेतनने केला खून
लावण्या आणि चेतन हे एकमेकांचे लांबचे नातेवाईक आहेत. चेतन हा लावण्यासोबत एकतर्फी प्रेम करत होता. लावण्याने चेतनच्या प्रपोजला नकार दिला होता. काही क्षणातच चेतनने आपल्या बॅगमधून एक चाकू काढला. इतक्यात लावण्या आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागली होती.
चेतनने पाठलाग करत लावण्यावर चाकूने हल्ला
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, लावण्या ही बसमधून उतरताच चेतनने तिचा पाठलाग करत तिच्यावर चाकूने हल्ला केला. लावण्याने जीव वाचवण्यासाठी धडपड केली. इतक्यात हल्लेखोराने तिचा पाठलाग करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. इतक्यात आरोपी चेतन हा घटनास्थळावरून पळून गेला.
हे ही वाचा : सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत गोपनीयता, वकिलांनाही भेटीची परवानगी नाकारली
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बंटवाल उपविभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी गेले. परिस्थितीचा आढावा देखील घेतला. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पोलिसांचे पथक पाठवण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT












