Crime News : पटियाला येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेत एका अल्पवयीन खेळाडूवर झालेल्या कथितरित्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. पटियाला पोलिसांनी कझाकस्तानने सायकलिंग प्रशिक्षक मॅक्सत अयझबायेव यांच्या विरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 13 सप्टेंबर रोजी घडली होती, तर 18 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? पोस्ट होतायत व्हायरल
पीडित अल्पवयीन खेळाडूवर लैंगिक अत्याचार
पटियाला शहर पोलीस अधीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 (2) आणि 351 (3) पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित तथ्ये आणि उपलब्ध पुराव्यांशी संबंधित चौकशी केली. तपासादरम्यान, समोर येणाऱ्या महितीच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
आरोपी हा दिल्लीतील एका सायकलिंग शिबिरात सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पटियाला पोलिसांच्या विशेष पथकांनी त्याचा शोध घेतला आणि अनेक ठिकाणी छापे टाकले. मात्र, आरोपी तिथे साडपला नाही, दरम्यान, पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
अल्पवयीन खेळाडूची आवश्यक वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीतील निष्कर्ष आणि तपासातून समोर येणाऱ्या इतर तथ्यांच्या आधारे प्रकरणाची पुढील कारवाई केली जात आहे. पोलीस सध्या आरोपीचे ठिकाण आणि प्रकरणाच्या इतर पैलूंचा देखील तपास करत आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा : मीरा भाईंदर: डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड, मनसे आक्रमक
अल्पवयीन मुलींची ओळख कोणत्याही प्रकारे उघड करू नये. प्रसारमाध्यमे आणि इतर व्यक्तींना पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क टाळण्यास सांगितले. पॉक्सो कायद्यानुसार, अल्पवयीन पीडित मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT












