दिव्यांग बायको गावात विवस्त्र फिरायची, नवऱ्याने सगळंच संपवलं; काय घडलं?

मुंबई तक

• 08:11 AM • 22 Sep 2026

बलिया येथे एका 65 वर्षीय महिलेची आणि तिच्या 22 वर्षीय दृष्टिबाधित मुलीची हत्या करण्यात आली. महिलेचे 70 वर्षीय पती, रामचीज गुप्ता यांनी पोलिसांना सांगितले की अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केली आहे. पण जसजसा पोलिसांचा तपास पुढे सरकला, तसतसे या प्रकरणाचे खरे स्वरूप समोर आले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिव्यांग बायको गावात विवस्त्र फिरायची

point

नवऱ्याने सगळंच संपवलं

point

काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील मुस्तफाबाद गावात 17 सप्टेंबर रोजी एका घरातून मायलेकीच्या दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली. घरात राहणाऱ्या 65 वर्षीय मानती देवी आणि त्यांची 22 वर्षीय दिव्यांग मुलगी गौरी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. कुटुंबाचे प्रमुख 70 वर्षीय रामचीज गुप्ता यांनी स्वतः पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अज्ञात हल्लेखोरांनी आपली पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा दावा त्यांनी केला. प्रथमदर्शनी हे प्रकरण एखाद्या बाहेरील व्यक्तीने केल्यासारखे वाटत होते, मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यावर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.

हे वाचलं का?

बायको विवस्त्र अवस्थेत गावात फिरायची

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी SWAT, सर्व्हिलन्स आणि रसडा पोलिसांचे संयुक्त पथक तैनात करण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि इतर धागेदोरे पोलिसांनी जोडायला सुरुवात केली. जसजसा तपास आणि चौकशी पुढे सरकली, तसतशी संशयाची सुई कुटुंबाचा प्रमुख रामचीज गुप्ता याच्याकडेच वळू लागली. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले की, रामचीजनेच आपली पत्नी आणि मुलीच्या हत्येचा कट रचला होता. मानती देवी मानसिक आजाराने त्रस्त होत्या आणि अनेकदा त्या विवस्त्र अवस्थेत गावात फिरायला जात असत. दुसरीकडे, त्यांची मुलगी गौरी दृष्टिहीन असल्याने आई घरात नसताना तिला इतरांकडे अन्न मागावे लागत होते. कुटुंबाच्या या स्थितीमुळे समाजात आपली बदनामी होत आहे या विचाराने रामचीज त्रस्त होता आणि याच कारणामुळे त्याने या दोघींनाही कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने सपासप वार करून संपवलं

धारदार शस्त्राने हत्या अन्...

आपला कट तडीस नेण्यासाठी रामचीजने गावातीलच चंदन यादव आणि दिनेश गुप्ता या दोघांना आपल्यासोबत सामील करून घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरच्या संध्याकाळी या तिघांनी मिळून धारदार शस्त्राने मानती देवी आणि गौरी यांची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी घरातील रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तसेच मुलीचा मृतदेह घरातून बाहेर काढून एका शेतात फेकून दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, 17 सप्टेंबरला रामचीजने अत्यंत चलाखीने पोलिसांना बोलावून अज्ञात लोकांनी हत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात हा सगळा कट उघडकीस आला आणि या हत्याकांडाचे सत्य समोर आले.

हे ही वाचा : चॅटजीपीटी वापरताना सापडला, आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; संतप्त विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने

प्रतिष्ठेसाठी हत्या

पोलिसांनी तातडीने कारवाई करत रामचीज गुप्तासह तिन्ही आरोपींना सिधागरघाट जवळून अटक केली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र आणि रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. समाजात आपली कथित प्रतिष्ठा जपण्यासाठी एका पित्याने आणि पतीनेच आपल्या कुटुंबाचा बळी घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलीस या हत्येचा संपूर्ण कट, इतर आरोपींची नेमकी भूमिका आणि घटनाक्रमाशी जोडलेल्या सर्व पैलूंचा सविस्तर तपास करत आहेत.