नागपूर: मुलगी ऑनलाईन गेमच्या जाळ्यात, उत्तर प्रदेशात नेऊन लैंगिक अत्याचार

योगेश पांडे

• 02:11 PM • 21 Sep 2026

Nagpur crime : नागपूर येथील एका शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीला ऑनलाईन गेमच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे. एवढंच नसून तरुणीला फसवून उत्तर प्रदेशात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे.

Nagpur crime

Nagpur crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीला ऑनलाईन गेमच्या जाळ्यात ओढलं

point

उत्तर प्रदेशात नेत केले लैंगिक अत्याचार

Nagpur Crime : नागपूर येथील एका शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीला ऑनलाईन गेमच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे. एवढंच नसून तरुणीला फसवून उत्तर प्रदेशात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. बेलतरोडी पोलिसांनी पीडित मुलीला उत्तर प्रदेशातून पुन्हा सुखरूप आणले. या घटनेनं महिला, मुली आणि तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातूर: 18 वर्षीय तरुणांचा दुचाकीवरून अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू; घातपाताचा संशय

मुलीला उत्तर प्रदेशात फसवून नेत नराधमाने केला अत्याचार 

संबंधित प्रकरणात आरोपीची सुरजकुमार राजपूत अशी ओळख समोर आली आहे. नंतर आरोपी सुरजकुमारला अटक करण्यात आली, तसेच आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. आरोपी सुरजने फ्री फ्रायर गेमच्या माध्यमातून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतले होते. तो इथवरच न थांबता त्याने मुलीला उत्तर प्रदेशात फसवून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. 

उत्तर प्रदेशातून पीडितेची पोलिसांनी केली सुटका 

मुलगी घरात कुठेच सापडत नसल्याने कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मुलीचा शोध सुरूच ठेवला होता. संबंधित प्रकरणात तपासादरम्यान, मुलगी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे आढळून आली अशी माहिती पोलिसांना कळताच, ते सीतापूरकडे रवाना झाले, नंतर पीडित मुलीची सुटका देखील केली होती. 

हे ही वाचा : Astrology : बुध ग्रह चित्रा नक्षत्रात होणार गोचर, 'या' राशींना भरघोस फायदा

दरम्यान, पोलिसांनी सूरज राजपूतला ताब्यात घेत नागपूरला आणले. नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस करत आहेत.