Crime News : कानपूरमधून एक समलैंगिक प्रेमाची थक्क करणारी घटना समोर आली आहे. तीन मुलांची आई असलेल्या एका 32 वर्षीय महिलेचे दिल्लीत राहणाऱ्या 30 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले. या दोन्ही महिलांची वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. यानंतर ही महिला आपल्या तीन मुलांना आणि पतीला सोडून 6 सप्टेंबर रोजी अचानक गायब झाली होती.
ADVERTISEMENT
प्रेयसीसोबत रहात असतानाच...
महिलेच्या कुटुंबीयांनी महाराजपूर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की, ही महिला एका भाड्याच्या खोलीत राहत आहे. पोलिसांनी तात्काळ धाड टाकली असता, ती महिला तिच्या प्रेयसीसोबत राहत असल्याचे आढळून आले. सरसौल येथील एका तरुणाच्या मदतीने त्यांनी ही खोली भाड्याने घेतली होती, जिथे दिल्लीहून आलेली ती युवती तिच्यासोबत राहू लागली होती.
हे ही वाचा : नांदेड: किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या मुलीला रस्त्यात गाठलं, नंतर केलं लैंगिक शोषण
लग्न करुन एकत्र राहण्याचा निर्णय
पोलीस या दोन्ही महिलांना आणि त्यांना मदत करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन महाराजपूर पोलीस ठाण्यात घेऊन आले. तपासात समोर आले की दोन्ही महिला एकाच समुदायाच्या असून त्यांनी एकत्र लग्न करून राहण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू, चुलत भाऊ अन् मित्र ताब्यात; नेमकं काय घडलं?
ठाम निर्धार
सध्या ही महिला तिच्या पतीकडे किंवा घरी परत जाण्यास साफ नकार देत असून, ती तिच्या प्रेयसीसोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम आहे. महाराजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी जनार्दन सिंह यांनी सांगितले की, हे समलैंगिक संबंधांचे प्रकरण असून दोन्ही महिला एकत्र राहण्यास तयार आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












