प्रेयसी करायची रेकी अन् नंतर प्रियकर करायचा कांड, शेवटी काय घडलं?

मुंबई तक

• 08:11 AM • 21 Sep 2026

जयपूरमधील एटीएममधून 41.70 लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी तिच्या प्रियकर आणि त्याच्या साथीदारांसोबत या दरोड्यात सामील होती.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेयसी करायची रेकी अन् नंतर प्रियकर करायचा कांड

point

शेवटी काय घडलं?

Crime News : बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये झालेली 41.70 लाख रुपयांची सशस्त्र दरोड्याची घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 14 सप्टेंबरच्या सकाळी घडलेल्या या घटनेत एका प्रेयसी आणि प्रियकराचा मुख्य सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. बँक कर्मचाऱ्याशी असलेल्या संपर्कामुळे प्रियकर मस्तराम याला एटीएममध्ये मोठी रक्कम येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी दरोड्याचा कट रचला आणि त्यात मस्तरामने आपली प्रेयसी अंशु हिलाही सहभागी करून घेतले.

हे वाचलं का?

असा होता प्लॅन

योजनेनुसार अंशुला एटीएमच्या आसपास रेकी करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. 14 सप्टेंबरच्या सकाळी साडेदहाच्या सुमारास जेव्हा बँक कर्मचारी रोख रक्कम घेऊन एटीएमवर पोहोचले, तेव्हा तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या अंशुने तात्काळ मस्तरामला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवला आणि अवघ्या काही मिनिटांत 41.70 लाख रुपये लुटून पोबारा केला. जयपूरमधील ही घटना आहे.

हे ही वाचा : शिवसेना सुनावणी : शिंदे गटाकडून बहुमताचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय घडतंय? LIVE अपडेट्स

नाकाबंदीलादेखील चकवले

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची छाननी केली. तपासादरम्यान पोलिसांचा संशय अंशुवर बळावला आणि तिची ओळख पटवून तिला अटक करण्यात आली. आरोपींनी केवळ लुटमारीची योजनाच आखली नव्हती, तर पोलिसांना चकवा देण्यासाठी पळ काढण्याची पूर्वतयारीही केली होती. दरोड्यानंतर अंशुला कारमध्ये बसवून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आणि नाकाबंदीतून वाचण्यासाठी तिचे कपडेही बदलण्यात आले होते. तसेच लुटलेली रक्कम वेगवेगळ्या भागांत वाटून अंशुच्या खोलीतील सुटकेसमध्ये ठेवण्यात आली होती.

हे ही वाचा : Govt Jobs : 12 वी उत्तीर्णांसाठी 2536 जागांची भरती, सरकारी नोकरीची ही संधी सोडू नकाच!

प्रेयसी कशी फसली?

पोलिसांनी कारवाई करत अंशुला अटक केली असून तिच्याकडून 26.80 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. प्राथमिक तपासात आरोपींवर मोठे कर्ज असल्याने त्यांनी हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. सध्या मुख्य सूत्रधार मस्तराम मीणासह इतर तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणातील बँकेच्या कर्मचाऱ्याची नेमकी भूमिका आणि उर्वरित रकमेचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.