Crime News : गाझियाबाद येथील एका उच्चभ्रू सोसायटीत मंगळवारी (15 सप्टेंबर) संध्याकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आय टॉवरच्या 15 व्या मजल्यावरून 16 वर्षीय मुलगी खाली पडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीला पोलिसांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. शनाया बिष्ट असे या मृत मुलीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
सुसाईड नोट सापडली
या घटनेची माहिती मिळताच विजयनगर पोलिस ठाण्याचे पथक सायंकाळी सातच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने परिसर ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि आवश्यक पुरावे गोळा केले. घटनास्थळाची पाहणी करत असताना पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. प्राथमिक तपासानुसार, या नोटमध्ये मुलीने अभ्यासाच्या आणि शैक्षणिक तणावाचा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : नांदेड: किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या मुलीला रस्त्यात गाठलं, नंतर केलं लैंगिक शोषण
इतर कारणांचा शोध
पोलीस निरीक्षक धर्मपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. सापडलेल्या नोटव्यतिरिक्त मुलीच्या अभ्यासाचे वातावरण, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि घटनेपूर्वीच्या घडामोडींची माहिती घेतली जात आहे. घटनेमागे इतर काही कारणे होती का, याचाही शोध विजयनगर पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा : अनैतिक संबंधांवरुन वाद, पतीने पत्नीवर केले शेव्हिंग ब्लेडने वार!
एवढ्या लहान वयातच...
या 16 वर्षीय मुलीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून सोसायटीतील रहिवासीही सुन्न झाले आहेत. एवढ्या लहान वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून नागरिकांना या घटनेसंदर्भात काही माहिती असल्यास ती पोलिसांसोबत सामायिक करण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT












