अनैतिक संबंधांवरुन वाद, पतीने पत्नीवर केले शेव्हिंग ब्लेडने वार!

मुंबई तक

Crime News : पतीच्या कथित प्रेमसंबंधावरून झालेल्या वादात पत्नीवर शेव्हिंग ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे. महिलेच्या तोंडाला आणि घशाला जखमा झाल्या असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना दिल्लीत घडली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधांवरुन वाद

point

पतीने पत्नीवर केले शेव्हिंग ब्लेडने वार!

Crime News : पतीच्या कथित अनैतिक संबंधावरून झालेल्या वादातून एका 35 वर्षीय महिलेवर दाढी करायच्या ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पती माजिद हुसेन याने पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिलेच्या तोंडाला आणि घशाला अनेक जखमा झाल्या. पोलिसांनी माजिद हुसेनला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हल्ल्यासाठी वापरलेला शेव्हिंग ब्लेडही पोलिसांनी जप्त केला आहे. ही घटना 13 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता घडली.

पतीचे दुसऱ्या महिलेसोबत कथित प्रेमसंबंध

महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत कथित प्रेमसंबंध होते. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. पती आपल्यासोबत भांडण आणि मारहाण करत असल्याचाही महिलेचा आरोप आहे. सततच्या वादाला कंटाळून सुमारे 15 दिवसांपूर्वी ती आपल्या तीन मुलांना घेऊन लोणी येथील माहेरी गेली होती. मात्र, हल्ल्याच्या दोन दिवस आधी माजिद हुसेन आणि त्याच्या वडिलांनी तिला पुन्हा घरी येण्यासाठी समजावले. त्यांच्या सांगण्यावरून महिला मुलांसह घरी परतली.

घरी परतताच काही वेळातच पती-पत्नीमध्ये वाद उफाळला 

घरी परतल्यानंतर काही वेळातच पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. 13 सप्टेंबरच्या रात्री हा वाद वाढला. याच दरम्यान माजिद हुसेनने कथितरित्या शेव्हिंग ब्लेडने पत्नीवर हल्ला केला. त्याने महिलेच्या तोंडावर आणि घशावर वार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. रात्री सुमारे 11.40 वाजता नंद नगरी पोलीस ठाण्यात एका महिलेवर तिच्या पतीने मानेवर हल्ला केल्याची पीसीआर कॉलद्वारे माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत महिलेला राजीव गांधी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात महिलेचा जबाब नोंदवला. दिल्लीतील सुंदर नगरी परिसरात ही घटना घडली. 

महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी 14 सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल केला. हे कलम हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. त्यानंतर माजिद हुसेनला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने हल्ल्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याच्या सांगण्यावरून हल्ल्यात वापरलेला शेव्हिंग ब्लेड जप्त करण्यात आला. माजिद हुसेनचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच तो पोलिसांच्या नोंदीनुसार 'बॅड कॅरेक्टर' म्हणून सूचीबद्ध नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.