पेन्शनसाठी मुलगा बनला क्रूर, आई अन् बहिणीसोबत केलं नको तेच

मुंबई तक

• 01:17 PM • 20 Sep 2026

जौनपूरमध्ये जमीन आणि पेन्शनवरून झालेल्या कौटुंबिक वादातून 70 वर्षीय शीतला देवी आणि त्यांची मुलगी गौरा देवी यांची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी शीतला देवी यांचा मुलगा भूपेंद्र पटेल याला अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पेन्शनसाठी मुलगा बनला क्रूर

point

आई अन् बहिणीसोबत केलं नको तेच

Crime News : नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिला शीतला देवी आणि त्यांची मुलगी गौरा देवी यांचा समावेश आहे. सुरुवातीला या भयानक दुहेरी हत्याकांडाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्यामागील कारणे अस्पष्ट होती. मात्र, आता या गुन्ह्यामागील सत्य समोर आले असून, मारेकरी बाहेरील कोणी नसून कुटुंबातीलच एक सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

जमीन अन् पेन्शनचा वाद

या खळबळजनक हत्याकांडामागील मुख्य कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या वाटपावरून सातत्याने भांडणे सुरू होती. याशिवाय, वृद्ध आई शीतला देवी यांना मिळणारी पेन्शनची रक्कम हेदेखील या वादाचे एक प्रमुख कारण होते. याच अंतर्गत कौटुंबिक वादाने आणि पैशांच्या प्रश्नांनी इतके भयंकर रूप धारण केले की, त्यातूनच या रक्तरंजित गुन्ह्याला अंजाम देण्यात आला.

हे ही वाचा : शेजाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध, शेवटी नदीकाठी सडलेला मृतदेह सापडला

रागाच्या भरात मुलानेच...

आईला आणि बहिणीला मृत्यूच्या दाढेत ढकलणारा दुसरा तिसरा कोणी नसून शीतला देवी यांचा स्वतःचा मुलगा भूपेंद्र पटेल हाच आहे. जमीन आणि पैशांच्या वादातून आरोपी भूपेंद्र इतका हिंसक झाला की, त्याने रागाच्या भरात कुऱ्हाड उचलली आणि आपली आई शीतला देवी तसेच बहीण गौरा देवी यांची निर्दयीपणे हत्या केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला असून, अशा क्रूर कृत्यामुळे रक्ताच्या नात्यांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे ही वाचा : सतीश सालीयान मातोश्रीच्या बाहेर, ठाकरेंना नोटीस देत काय बोलून गेले?

अंतर्मुख करायला लावणारी घटना

या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई करत आरोपी मुलगा भूपेंद्र पटेल याला तिथूनच अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाडही घटनास्थळावरून जप्त केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. घरातील अंतर्गत वाद किती जीवघेणे परिणाम घडवून आणू शकतात, याचा विचार करायला लावणारी ही अत्यंत वेदनादायक आणि समाजाला अंतर्मुख करणारी घटना आहे.