दोन तरुणांसोबत लॉजवर गेली तरुणी, शेवटी बाथरुममध्ये आढळला मृतदेह

मुंबई तक

20 Sep 2026 (अपडेटेड: 20 Sep 2026, 12:38 PM)

Crime News : एका लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तरुणीचा मृतदेह लॉजच्या बाथरूममध्ये आढळला असून, तिच्यासोबत आलेले दोन तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दोन तरुणांसोबत लॉजवर गेली तरुणी

point

शेवटी बाथरुममध्ये आढळला मृतदेह

Crime News : एका लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तरुणीचा मृतदेह लॉजच्या बाथरूममध्ये आढळला असून, तिच्यासोबत आलेले दोन तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यातील वलालाहल्ली शहरातील एका लॉजमध्ये ही घटना घडली. 

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, बंगळुरुतील चिक्कबानावरा येथे राहणारी 23 वर्षीय वर्षा दोन तरुणांसोबत सकलेशपूर, हासन येथे गेली होती. तिघांनी वलालाहल्ली येथील श्रीदेवू लॉजमध्ये चेक-इन केले होते. मात्र सकाळी वर्षा बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्यासोबत लॉजमध्ये आलेले दोन्ही तरुण तेथून निघून गेले होते.

पोलिसांकडून फरार तरुणांचा शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा मागील शुक्रवारी या दोन तरुणांसोबत लॉजमध्ये आली होती. तिच्या मृत्यूनंतर दोन्ही तरुण फरार झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. वर्षाच्या मृत्यूमागे फरार झालेले दोन्ही तरुण जबाबदार आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमुळे वर्षाच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून फरार तरुणांचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असून, डेप्युटी एसपी मालतेश यांनी लॉजला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. वर्षाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील दोषी कोणताही असला तरी त्याला सोडले जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना सकलेशपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सध्या पोलिसांचे पथक फरार झालेल्या दोन्ही तरुणांचा शोध घेत आहे.