शिरुरमध्ये रक्तरंजित खेळ, पहाटे झालेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू

मुंबई तक

19 Sep 2026 (अपडेटेड: 19 Sep 2026, 07:09 PM)

Pune crime news : ग्रामीण पुण्यातील शिरुर शहरातील लाटेआळी, आंबेडकरनगर परिसरात गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना गुरूवारी 18 सप्टेंबर रोजी सकळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.

Pune crime news

Pune crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिरुर येथील लाटेआळी, आंबेडकरनगर परिसरात गोळीबार

point

एकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime News : रायचंद शिंदे - ग्रामीण पुण्यातील शिरुर शहरातील लाटेआळी, आंबेडकरनगर परिसरात गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना गुरूवारी 18 सप्टेंबर रोजी सकळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात मृत व्यक्तीची हरी गंगावणे अशी ओळख समोर आली. यादरम्यान, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. संबंधित घटनेनं परिसर पूरता हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मस्करीत चेहऱ्याला लावला केक, सपासप वार करत तरुणाला संपवलं

शिरुरमध्ये सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार

घडलेल्या घटनेनुसार, सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार केल्याचा आवाज आला होता. या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेले होते. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शरुर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जाऊन प्रकरणाचा तपास केला. 

हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्या पुरूषासोबत प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने सपासप वार करून संपवलं

अशातच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काडतूस जमा केले. दरम्यान, हरी गंगावनेच्या हत्या का करण्यात आली? गोळीबार करण्यामागे नेमका कोणाचा हात होता? याचा पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, ग्रामीण पुणे असो की शहर. या ठिकाणी गुन्हेगारीत वाढ झालेली दिसून येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त समोर आले आहे.