अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करुन हत्या, कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके

मुंबई तक

• 11:26 AM • 18 Sep 2026

दिल्लीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मोकाट कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडले होते.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करुन हत्या

point

कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके

Crime News : एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलीवर अत्याचार करून तिला भोसकून एका शेतात फेकून देण्यात आले होते. तिचा मृतदेह इतक्या कुजलेल्या अवस्थेत होता की फॉरेन्सिक टीमला सुरुवातीला तिचे लिंग ओळखणेही कठीण जात होते. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (17 सप्टेंबर) कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून, यात 16 ते 17 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांचा आणि शिवम उर्फ सुदामा नावाच्या एका सज्ञान आरोपीचा समावेश आहे. वायव्य दिल्लीतील ही घटना आहे.

हे वाचलं का?

कुत्र्यांनी तोडले शरीराचे लचके

या घटनेचा उलगडा 13 सप्टेंबरच्या सकाळी झाला, जेव्हा पोलिसांना एका शेतात एक मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते. एका टेम्पोमध्ये एकत्र मद्यपान केल्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. अत्यंत भयानक बाब म्हणजे, मोकाट कुत्र्यांनी तिच्या शरीराचे काही लचके तोडले होते आणि तिचा एक हात शरीरापासून वेगळा होऊन शेतात पडलेला आढळला. या मुलीला अनेकदा घराबाहेर जाऊन काही दिवसांनी परत येण्याची सवय असल्याने, तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल केली नव्हती.

हे ही वाचा : आदित्य ठाकरेंना थेट 500 कोटींची मानहानीची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

50 सीसीटीव्ही अन् 'तो' टेम्पो

या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यात त्यांना एक टेम्पो संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. अंधार आणि खराब दृश्यमानतेमुळे सुरुवातीला या वाहनाचा क्रमांक ओळखता आला नाही, परंतु पोलिसांनी तपास करत खड्डा कॉलनीत उभा असलेला तो टेम्पो शोधून काढला. यानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याच्या चौकशीतून इतर तीन संशयितांची माहिती उघडकीस आली आणि पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

हे ही वाचा : मराठवाड्याजवळ चक्राकार वारे तयार, कुठल्या तारखांना पावसाची शक्यता?

चाकू, रक्ताने माखलेले कपडे जप्त

पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले दोन चाकू आणि गुन्ह्याच्या वेळी आरोपींनी घातलेले रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. टेम्पो चालकाच्या माहितीवरून तीन अल्पवयीन मुले आणि शिवम उर्फ सुदामा यांना ताब्यात घेण्यात आले असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या अत्यंत गंभीर प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि 'पॉक्सो' (POCSO) कायद्याच्या कलम 6 अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.