मराठवाड्याजवळ चक्राकार वारे तयार, कुठल्या तारखांना पावसाची शक्यता?
Maharashtra Weather Report : महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून मराठवाड्यासह अनेक भागांत पावसाचा अंदाज आहे. 21 ते 29 सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांत पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मराठवाड्याजवळ चक्राकार वारे तयार
कुठल्या तारखांना पावसाची शक्यता?
Maharashtra Weather Report : महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत पाऊस आणि मेघगर्जनेसह सरींचा अंदाज आहे. मराठवाड्याच्या आसपास चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत जाणवण्याची शक्यता आहे. तसेच थायलंडजवळ तयार झालेले चक्राकार वारे पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यातून बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण तयार होऊन भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा : Personal Finance: घरातील एकाच व्यक्तीला सगळे आर्थिक व्यवहार माहीत असणं योग्य की अयोग्य?
राजस्थानमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता सौराष्ट्राच्या आसपास पोहोचले आहे. अरबी समुद्रातून मिळणारी आर्द्रता हे क्षेत्र खेचून घेत असल्याने कोकणातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाड्याच्या आसपास चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या हवामान प्रणालीला अपर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन असे म्हटले जात आहे. मराठवाड्यापासून म्यानमारपर्यंत कमी दाबाचा पट्टाही तयार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काही दिवसांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
21 ते 29 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता
21 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसासाठी पोषक स्थिती राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये कोकणासोबतच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील भागांचाही समावेश आहे. 21 ते 29 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता अधिक असल्याचे नकाशावरून दिसत आहे. या काळातील पाऊस काही भागांना दिलासा देणारा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
