Crime News : नात्यांना काळीमा फासणाऱ्या एका बहुचर्चित प्रकरणात पॉक्सो (POCSO) विशेष न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपल्या अवघ्या 8 महिन्यांच्या आजारी बाळाला आणि पत्नीला सासुरवाडीत वाऱ्यावर सोडून, अल्पवयीन मेहुणीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सौरभ कुमार या नराधम जावयाला दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश तथा अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी पार पडली. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने झारखंडच्या गोड्डा येथील रहिवासी असलेल्या सौरभ कुमारला दोषी घोषित केले.
ADVERTISEMENT
आठ महिन्यांच्या मुलीला सोडून पळाला
सरकारी वकिलांनी पीडितेची बाजू मांडत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलेल्या आरोपीच्या शिक्षेचा कालावधी सुनावण्यासाठी पुढील तारीख निश्चित केली आहे. प्रकरणाच्या पार्श्वभूमीनुसार, झारखंडमधील गोड्डा येथील रहिवासी सौरभ कुमार साह याचा विवाह 21 जुलै 2024 रोजी एका तरुणीशी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. या लग्नानंतर त्यांना एक आठ महिन्यांची मुलगी झाली. 30 सप्टेंबर 2024 रोजी सौरभ आपल्या पत्नी आणि आजारी मुलीसह सासुरवाडीला आला होता.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंना थेट 500 कोटींची मानहानीची नोटीस, नेमकं प्रकरण काय?
अल्पवयीन मेहुणीला लावली फूस
मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तिची आई (सौरभची पत्नी) आणि आजी तिला उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेल्या होत्या. हीच संधी साधून सौरभने आपल्या अल्पवयीन मेहुणीला फूस लावून गपचूप आपल्यासोबत गोड्डा येथे पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर चिंतेत पडलेल्या नातेवाईकांनी सौरभशी संपर्क साधला असता, त्याने आपल्या सासूला अत्यंत निर्लज्जपणे सांगितले की, तो आता आपल्या पत्नीसोबत राहणार नाही आणि अल्पवयीन मेहुणीसोबतच आयुष्य घालवेल. नातेवाईक आणि समाजातील लोकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी आपल्या हट्टावर ठाम राहिला आणि मुलीला परत पाठवण्यास स्पष्ट नकार दिला.
हे ही वाचा : अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कार करुन हत्या, कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके
जीवाला धोका असल्याची तक्रार
यानंतर पीडितेच्या आईने आपल्या लहान मुलीचे अपहरण झाल्याचे आणि तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस ठाण्यात जावई सौरभ कुमारविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणात न्यायालयाने सर्व पुरावे आणि परिस्थितीचा विचार करून आरोपीवर लावण्यात आलेले दोष सिद्ध केले असून आता सर्वांचे लक्ष त्याच्या शिक्षेच्या घोषणेकडे लागले आहे.
ADVERTISEMENT












