बीडच्या तरुणाची लातूरमध्ये निर्घृण हत्या, 10 लाखांच्या वादातून कोयत्याने सपासप वार

मुंबई तक

• 05:48 PM • 17 Sep 2026

Latur crime : बीडच्या परळीतील तरुणाची लातूरमध्ये निर्घृणपणे हत्या केल्याची घटना आहे. वाळूच्या व्यवसायात 10 लाख रुपयांच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून तरुणाला लातूरच्या हॉटेल आमेर येथे धारदार शस्त्रांनी हल्ला करत संपवलं. या हल्ल्यात तक्रारदार तरुणाला देखील गंभीर इजा झाल्याची माहिती समोर आली.

Latur crime

Latur crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लातूरच्या आमेर हॉटेलमध्ये तुफान राडा 

point

जुन्या पैशांच्या वादातून तरुणावर सपासप वार

point

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Latur Crime : रोहिदास हातागळे - बीडच्या परळीतील तरुणाची लातूरमध्ये निर्घृणपणे हत्या केल्याची घटना आहे. वाळूच्या व्यवसायात 10 लाख रुपयांच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून तरुणाला लातूरच्या हॉटेल आमेर येथे धारदार शस्त्रांनी हल्ला करत संपवलं. या हल्ल्यात तक्रारदार तरुणाला देखील गंभीर इजा झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनं परिसर पूर्ण हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघांनी केला अत्याचार, नंतर रस्त्याच्या कडेला दिलं सोडून

लातूरच्या आमेर हॉटेलमध्ये तुफान राडा 

शिवाजीनगर पोलीस ठाणे, लातूर येथे तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. घडलेल्या घटनेनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर येथे तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  आरोपींची तक्रारदार मजहरखान नादरखान पठाण (वय 43) हे त्यांचे मित्र शेख मन्सूर अली शेख लायक अली (वय 35) आणि शेख सत्तार शेख जब्बार यांच्यासोबत बांधकामाच्या कामासाठी इनोवा कारने (MH 23 BB 4777) बिदरकडे जात होते. त्यानंतर लातूर येथील आमेर हॉटेलमध्ये गेले असता, 16 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी थांबले होते. 

इतक्यात परळीतील अल्ताफ खान पठाण, खालेद हमीन शेख आणि उमर महेबूब शेख मन्सून यांच्यावर हल्ला चढवला, त्यानंतर अल्ताफ खानने कोयत्याने मानेवर सपासप वार केले. तर दुसरीकडे मेहबूब शेखने चाकूने छातीवर आणि पूर्ण शरीरावर वार केले, या हल्ल्यादरम्यान खालेद हमीदने खाली पडलेल्या फरशीने पीडित तरुणाच्या डोक्यात हल्ला केला. 

मध्यस्ती करणाऱ्यावर हल्ला 

या घटनेदरम्यान वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तक्रारदार मजहरखान पठाणवरही आरोपींनी हल्ला केला, त्यानंतर तो देखील जखमी झाला. तर शेख सत्तार यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यात आरोपी हा फॉर्च्युनर कारने घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर जखमी असलेल्या शेख मन्सूनला लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

हे ही वाचा : कल्याण : पतीसोबतचा वाद मिटवतो, बहाणा करुन बोलावलं अन् भाजप नेत्याकडून अत्याचार

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

 

संबंधित प्रकरणात मजहरखान पठाण यांच्या फिर्यादीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी अल्ताफला खान सरदार पठाण, खालेद हमीद शेख आणि उमर महेबूब शेख विरुद्ध भारतीय न्यायसंहिता अंतर्गत 2023 च्या कलमान्वये 103(1), 109(1) आणि3(5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीचा पोलीस पुढील तपास करत आहेत.