Crime News : छत्तीसगढ येथून मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कांकेर जिल्ह्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार तरुणांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कल्याण : पतीसोबतचा वाद मिटवतो, बहाणा करुन बोलावलं अन् भाजप नेत्याकडून अत्याचार
तीन आरोपींनी फसवून चौघांनी पीडितेवर केला लैंगिक अत्याचार
घडलेल्या घटनेनुसार, पीडिता ही मंगळवारी ओळखीच्याच मुलांसोबत बाहेर गेली होती. तीन आरोपींनी तिला फसवून एका गावात घेऊन गेले होते. तिथे त्यांनी चौघांनी मिळून पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. मंगळवारी रात्री पीडिता बराच वेळ झाला तरीही घरी पोहोचली नव्हती. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी घरी न आल्याबाबत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला.
20 ते 28 वर्षांच्या चार तरुण आरोपींना अटक
पोलीसांनी रात्रभर मुलीचा तपास केला असता, तिला एका निर्जनस्थळावरून आपल्या ताब्यात घेतले होते. नंतर पोलिसांनी पीडितेची मेडिकल टेस्ट केली, नंतर तिचा जबाब नोंदवून घेतला होता. पीडितेच्या जबाबानुसार, कारवाई करत 20 ते 28 वर्षांच्या चार तरुण आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : डोंबिवलीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, 85 वर्षीय नराधमाला बेड्या
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी पीडितेच्या आधीपासूनच ओळखीचा होता. आरोपींची चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, देशभरात महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. या अशा सातत्याने घडत असलेल्या घटनेनं महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
ADVERTISEMENT












