Sanjeev Sonawane Suicide : लातूर येथील शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे (वय 65) यांनी स्वत:वर गोळीबार करत जीवन संपवलं. या घटनेनं संपूर्ण लातूर शहर हादरून गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनेचा तपास केल्यानंतर त्यांची सुसाईड नोट हाती आली आहे, ज्यातून आत्महत्येचं कारण समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, बेडवर सुसाईड नोट आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन
सुसाईड नोटमध्ये काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्याच कुटुंबातील एका सदस्यांनी सुसाईड नोटवरील हस्ताक्षर हे त्यांचेच असल्याचे सांगितले. सुसाईड नोटमध्ये त्यांनी नमूद केलं की, आत्महत्येच कोणालाही जबाबदार धरले नाही. स्वत:ने हा निर्णय घेतला असल्याचा त्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. संबंधत सुसाईड नोटचा पोलीस पुढील तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी ते तणावात नव्हते अशी ठोस माहिती कोणत्याच नातेवाईकांनी सांगितली नाही. याचा एकूण तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोण आहेत संजीव सोनवणे?
संजीव सोनवणे हे फिजिक्सचे शिक्षक होते. त्यांचे लातूर शहरात अकरावी आणि बारावी सायन्सचे सोनवणे नावाचे कॉलेज होते. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे त्यांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण असलेले सोनवणे नावानेच गुरूकुल देखील आहे.
हे ही वाचा : ठाकरेंचा 'तो' अधिकार शिंदेंना खुपला, आयोगानेही नाकारला! सुप्रीम कोर्टात मोठा मुद्दा
दरम्यान, सोनवणे यांनी आत्महत्या का केली? हा मोठा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे. सोनवणे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने लातूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनवणे यांच्या अशा कृत्याने पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












