Crime News : तेलंगणाच्या के मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यात इयत्ता 10 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसोबत कथितरित्या लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आहे. पीडितेसोबत एक दोन नाही,तर नऊ जणांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. अशातच एका आरोपीचा पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जुन्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला तरुण, नवऱ्यानं प्रियकराला संपवलं
विद्यार्थनीचे अपहरण करत नऊ जणांकडून लैंगिक शोषण
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात आरोपींनी एका व्यक्तीच्या मदतीने मुलीचे अपहरण केले होते. नंतर तिच्यावर कथितरित्या तीन दिवसांपासून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. अशातच पोलिसांनी सांगितलं की, आरोपींमध्ये नऊ जणांचा समावेश आहे. आठ जण अटकेत असून प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नववा आरोपी फरार असून पोलिसांनी तपास केला आहे.
नऊ जणांविरोधात तक्रार अन् आठ जणांच्या मुसक्या आवळल्या
तेलंगणाच्या के मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील अलवाल पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आठ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशातच फरार असलेल्या नवव्या आरोपीचा पोलीस कसून तपास करत आहेत. दरम्यान, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अधिकची माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन
दरम्यान, महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT












