लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन

मुंबई तक

15 Sep 2026 (अपडेटेड: 15 Sep 2026, 02:17 PM)

Latur News : लातूर शहरातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध संस्थाचालाकाने राहत्या घरातच स्वत:वर गोळीबार करत जीवन संपवल्याची घटना आहे. या घटनेनं लातूर शहर हादरून गेले आहे.

Latur News

Latur News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लातूर शहरात संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी स्वत:ला संपवलं

point

घटनेनं लातूर शहर हादरलं

Latur News : अनिकेत जाधव - लातूर शहरातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध संस्थाचालाकाने राहत्या घरातच स्वत:वर गोळीबार करत जीवन संपवल्याची घटना आहे. या घटनेनं लातूर शहर हादरून गेले आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्यासुमारास घडली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर घटनेचा पुढील तपास सुरू केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना: चॉकलेटचं आमिष दाखवून 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, कुदळ फावड्याने घरावर हल्ला

संजीव सोनवणे यांनी स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन 

पोलिसांनी तपासादरम्यान पंचनामा केल्यानंतर संजीव सोनावणे यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली. संजीव सोनवणे यांनी गोळीबार करत जीवन का संपवलं? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास सुरू ठेवला असून, आत्महत्येमागील कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ते फिजिक्सचे शिक्षक होते. त्यांचे लातूर शहरात अकरावी आणि बारावी सायन्सचे सोनवणे नावाचे कॉलेज होते. 

अशातच धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे त्यांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण असलेले सोनवणे नावानेच गुरूकुल देखील आहे. अशातच त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे लातूर शहर हादरून गेले आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी संजीव सोनवणे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यानंतरच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरूच ठेवला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पाऊस सक्रिय, कुठे मध्यम तर... IMD चा अलर्ट

दरम्यान, सोनवणे यांनी आत्महत्या का केली? हा मोठा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे. सोनवणे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने लातूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनवणे यांच्या अशा कृत्याने पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.