Crime News : प्रेमप्रकरणातून तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. नंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून आरोपी बॉयफ्रेंड मोटारसायकलवर मृतदेहाचे पोते ठेवून जात होता. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आरोपीला पोत्याबाबत विचारले असता, प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या पुरुलिया येथील आहे. अमित नावाच्या तरुणाचे चार वर्षांपासून 19 वर्षीय नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसोबत प्रेमप्रसंग सुरू होते, मात्र अचाकन दोघांमध्ये खटके उडाले आणि होत्याचे नव्हते होऊन बसले. हा धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालच्या पुरुलिया येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन
आरोपीच्या दुचाकीवर पोत्यात आढळला गर्लफ्रेंडचा मृतदेह
आरोपी हा गर्लफ्रेंडचा मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून घेऊन जात असताना, पोलिसांनी आरोपीला पकडलं. सोमवारी रात्री, बलरामपूर पोलीस विद्यूत विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या कालीताला येथे पोहोचत असताना त्याने पोलिसांना वाहनाची तपासणी करताना पाहिले होते. दरम्यान, अमितला देखील पोलिसांनी थांबवले असता, प्रकरण समोर आले.
पोत्यात नेमकं काय? पोलिसांनी आरोपीला प्रश्न
त्याच्या दुचाकीच्या मागे एक पोते ठेवण्यात आले होते, पोलिसांनी पोत्यात नेमकं काय आहे? असा प्रश्न विचारले, नंतर अधिकाऱ्यांनीच ते पोते उघडले होते. पोत्यातील दृश्य पाहून पोलीस अधिकारी देखील थक्क झाले होते. संबंधित पोत्यात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. त्यांनी तात्काळ अमितला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले होते.
हे ही वाचा : जालना: चॉकलेटचं आमिष दाखवून 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, कुदळ फावड्याने घरावर हल्ला
चार वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंध
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, अमितने केलेले खुलासे धक्कादायकच होते. आरोपीने सांगितलं की, पोत्यात ज्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता, त्याची प्रेयसी होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यांपासून ती दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवण्यात आलाय.
ADVERTISEMENT












